शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात ‘हुमणी’बाधित क्षेत्र १२ हजार हेक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:30 IST

पाच तालुक्यांना फटका; कृषी खात्याकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू

ठळक मुद्देपावसाचा मोठा खंड पडल्याने यावर्षी ‘हुमणी’ने उसावर आक्रमण मुळाला कुरतडल्याने ऊस जागेवरच पडतो. वेळेत उपाययोजना केल्याने अधिक होणारे नुकसान टळले

सोलापूर : जिल्ह्यातील माढा, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस व करमाळा तालुक्यातील १० ते १२ हजार हेक्टरवरील उसाला ‘हुमणी’चा प्रादुर्भाव झाला असून, बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू असल्याचे सांगण्यात आले. आठवडाभरापासून कृषी व महसूल खात्याचे कर्मचारी पंचनामे करीत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्र व सर्वाधिक साखर कारखाने आहेत. यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात आले. यावर्षी जून महिन्यात सर्वत्रच पाऊस पडला. त्यानंतर पावसाचा प्रदीर्घ काळासाठी खंड पडला. यामुळे हुमणीच्या आळ्या बाहेर पडल्या व त्यांनी उसाच्या मुळावरच घाव घातला.

जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील सुमारे १२ हजार हेक्टर ऊस क्षेत्र हुमणीने बाधित झाले असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले. साधारण आॅगस्ट महिन्यात हुमणीचा प्रादुर्भाव सुरू झाला. हे लक्षात आल्यानंतर कृषी अधीक्षक कार्यालयाने यावर करावयाच्या उपाययोजनांचे शेतकºयांना प्रबोधन सुरू केले. साखर कारखान्यांना शेतकरी मेळावे घेऊन ‘हुमणी’वर करावयाच्या उपाययोजनांचे पत्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी दिले. साखर कारखाना व कृषी खात्याच्या वतीने प्रत्येक तालुक्यातील ‘हुमणी’ बाधित क्षेत्र परिसरात शेतकºयांचे जनजागृती मेळावे घेण्यात आले. यामुळे सध्या हुमणी आटोक्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

हुमणीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे काम मागील आठवडाभरापासून सुरू झाले आहे. कृषी खात्याचे कर्मचारी तसेच तलाठ्यामार्फत पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आठवडाभरात हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाला बाधित क्षेत्राची आकडेवारी कळविण्यात येणार असून, नुकसान भरपाईबाबत शासनच निर्णय घेईल, असे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.

दुष्काळात तेरावा..- ज्या भागात उजनी व नीरा धरणातून तसेच नदीद्वारे पाणी मिळते त्या भागात ‘हुमणी’च्या प्रादुर्भावाने ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. तर पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रातील उसाची वाढ पाण्याअभावी थांबली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ऊस क्षेत्र असले तरी हुमणी व दुष्काळामुळे वजनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे शेतकºयांचे तर नुकसान होणारच आहे, शिवाय कारखान्यांसाठीही त्रासाचे आहे.

पावसाचा मोठा खंड पडल्याने यावर्षी ‘हुमणी’ने उसावर आक्रमण केले. मुळाला कुरतडल्याने ऊस जागेवरच पडतो. शेतकºयांमध्ये ज्ानजागृती झाल्याने वेळेत उपाययोजना केल्याने अधिक होणारे नुकसान टळले आहे.-बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी