सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक संतापले; जाणून घ्या काय आहे ते कारण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 09:34 AM2020-03-05T09:34:55+5:302020-03-05T09:45:16+5:30
शिक्षक समायोजनाबाबत रात्री काढले पत्र; जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा गलथान कारभार...!
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने बुधवारी रात्री उशिरा परिपत्रक जारी केल्याने शिक्षकातून संताप व्यक्त केला जात आहे.
शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी बुधवारी रात्री उशिरा समायोजना बाबतचे पत्र जारी करुन उच्च न्यायालय दिव्यांग न्यायालय, अनुसूचित जमाती व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना गुरुवारी सकाळी समुपदेशनासाठी बोलावले आहे. यामध्ये न्यायालयाकडून आलेले 42 व इतर 28 अशा शिक्षकांचा समावेश आहे एसटी प्रवर्गामधून काढून टाकलेल्या व आता पुन्हा कामावर घेतलेल्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात समायोजन करावे अशी मागणी सुभाष माने यांनी केली आहे तर शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानुसार आधी मागील वर्षाचे समायोजन पूर्ण करावे अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.
खासगी शाळांमधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत पंजाबराव शिक्षक संघटना, राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. विरोध वाढला म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने समायोजनाबाबत घाई केल्याचा आरोप होत आहे.