सफाई कामगारांना प्रथिनेयुक्त पदार्थांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST2021-05-25T04:25:00+5:302021-05-25T04:25:00+5:30

करमाळा : करमाळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी कोरोना काळात नियमित अंडी ...

Distribution of protein to cleaners | सफाई कामगारांना प्रथिनेयुक्त पदार्थांचे वाटप

सफाई कामगारांना प्रथिनेयुक्त पदार्थांचे वाटप

करमाळा : करमाळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी कोरोना काळात नियमित अंडी व पोषक आहाराबरोबरच प्रथिनांनी युक्त, व्हिटॅमिन बी, कार्बोहाइड्रेट व लोहयुक्त पदार्थांचे सफाई कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीतही नगर परिषदेचे सफाई कर्मचारी आपली स्वच्छतेची कामे अविरतपणे पार पाडत आहेत. त्याचबरोबर कोरोना काळात कोरोना मृतांचे नियमानुसार अंत्यविधी, लसीकरण टोकन वाटप, कोविड केअर सेंटरला स्वच्छता, कोरोना चाचण्या, दंडात्मक कारवाई अशी एक ना अनेक कामे करणारे सफाई कर्मचारी मोठा हातभार लावत आहेत. यावेळी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी फुटाणे वाटप केले. यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांसाठी फळांचे वाटप, त्यांची आरोग्य तपासणी तसेच व्हिटॅमिनयुक्त गोळ्यांचे वाटप इत्यादी उपक्रमही नगराध्यक्षांनी राबविले आहेत.

--------

फोटो २३ करमाळा सफाई

करमाळा नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रथिनेयुक्त फुटाण्यांचे वाटप नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी केले.

---

Web Title: Distribution of protein to cleaners