शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
'मिआ बाय तनिष्क'च्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
4
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
6
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
7
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
8
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
9
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
10
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
11
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
12
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
13
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
14
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
15
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
16
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
17
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
18
Diwali Special Recipe: गॅसचा वापर न करता, घरच्या साहित्यात करा हलवाईसारखी रुचकर मिठाई
19
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
20
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल

सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिका तयार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 21:48 IST

सोलापूर जिल्ह्यातील राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता  हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करणारा प्रकल्प ठरतो.

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील एकूण १३४८ लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, १७ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उत्तर सोलापूरमधील राष्ट्रतेज अटल गृहप्रकल्प, गट क्र ९२/२, दहिटणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

 देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचा निवारा मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे या उद्दिष्टावर आधारित केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सदनिका वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच मा. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, पुणे मंडळाचे मा. सभापती शिवाजीराव आढळराव पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेतील सार्वजनिक–खाजगी भागीदारी मध्ये परवडणार्या  दरातील गृह बांधणी या घटकांतर्गत असंघटित कामगारांसाठी सोलापूर जिल्ह्यातील दहिटणे येथील राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये ५० इमारतींतून ३२७ चौ फुटांच्या १२०० स्वयंपूर्ण सदनिका उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या गृहप्रकल्पांतर्गत आतापर्यंत ११२८ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच सोलापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील शेळगी येथील श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रीय समाज महालक्ष्मी या गृहप्रकल्पांतर्गत ८ इमारतींची उभारणी करण्यात येत आहे यामध्ये एकूण २५२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी २२० सदनिकांचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राबविण्यात येणारा हा प्रकल्प म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगारांकरिता  हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती करणारा प्रकल्प ठरतो. सोलापूर जिल्ह्यातील हे दोन्ही प्रकल्प हरित पट्ट्यामध्ये  गृहप्रकल्प राबविण्यात येत असल्याने जमीन स्वस्त दरात उपलब्ध झाली आहे. यामुळे लाभार्थी सदनिका धारकास रु. १ लाख प्रती सदनिकेच्या किंमतीमध्ये बचत झाली आहे. असंघटित क्षेत्रातील ८११ बांधकाम मजुरांना कामगार विभागामार्फत रु. २ लाखांचे अतिरिक्त अनुदान प्राप्त झाले आहे. राज्य शासनाने नगरोत्थान योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा कामांसाठी म्हाडाकडे जबाबदारी सोपविली यामुळे गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा  या दोन्ही बाबी म्हाडामार्फतच  राबविण्यात आल्या. सदर प्रकल्प राबविण्यात येत असतांना आलेल्या अडचणींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या प्रकल्पाचे नियोजन सुकर केले आहे. नागरिकांचे जीवनमान सुखकर होण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांतर्गत सामुदायिक सभागृह, अंगणवाडी, सौरउर्जेवर चालणारे दिवे, मुलांसाठी खेळण्याचे मैदान, बाग व त्यामध्ये व्यायामाकरिता आवश्यक उपकरणे, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा सुविधांची उभारणी करण्यात आली आहे.