मुळेगावात दाखले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:57+5:302021-08-22T04:25:57+5:30

सोलापूर : महाराज्यस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान शिबिरात मुळेगाव येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे धनादेश, विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण राज्यमंत्री ...

Distribution of certificates in Mulegaon | मुळेगावात दाखले वाटप

मुळेगावात दाखले वाटप

सोलापूर : महाराज्यस्व अभियानांतर्गत विस्तारित समाधान शिबिरात मुळेगाव येथे

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेचे धनादेश, विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण राज्यमंत्री दर्जाचे राज्यस्तरीय आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या १० कुटुंबांना प्रत्येकी २० हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले. पारधी समाजातील कुटुंबांना अनुसूचित जमातीचे ५७ दाखले, उत्पन्न, रहिवासी,

अनुसूचित जाती व इतर मागास समाजाच्या दाखल्यांचे पंडित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, तहसीलदार अमोल कुंभार, सरपंच सविता भोसले, उपसरपंच शिवराज जाधव, तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड, विस्तार अधिकारी बी. के. चव्हाण, मंडळ अधिकारी जी. आर. धनुरे, ग्रामविकास अधिकारी नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of certificates in Mulegaon