शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

दोन देशमुखांच्या वादात सोलापूरकर वेठीला, अजित पवार यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 10:54 IST

सोलापूर :  दोन देशमुख सरळ वागत नाहीत. त्यांनी सोलापूरचे नाव बदनाम केले. त्यांना धड कर्तृत्व दाखवता येत नाही आणि नेतृत्वही करता येत नाही. त्यांच्यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागाला आणि शहराला वेठीस का धरता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला केला. शरद पवारांच्या निर्णयाचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून ...

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन सभा नॉर्थकोट मैदानावसोलापूर बाजार समितीमध्ये हुकूमशाही सुरु : अजित पवार

सोलापूर :  दोन देशमुख सरळ वागत नाहीत. त्यांनी सोलापूरचे नाव बदनाम केले. त्यांना धड कर्तृत्व दाखवता येत नाही आणि नेतृत्वही करता येत नाही. त्यांच्यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागाला आणि शहराला वेठीस का धरता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजप सरकारला केला. शरद पवारांच्या निर्णयाचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून सोलापूर विद्यापीठाला नाव देण्याचा   निर्णय घ्या, असे आवाहन त्यांनी  केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन सभा नॉर्थकोट मैदानावर झाली. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, उजनी धरण यावर्षी भरुनही पाणी मिळत नसेल तर काय उपयोग. सोलापुरातील वीणकर उद्योग शेजारच्या तेलंगणाला जाण्याच्या तयारीत आहे. ही बाब भूषणावह आहे का? दोन देशमुखांच्या भांडणात धड नाय मला, धड नाय तुला... अशी अवस्था झाली आहे. सुभाष देशमुखांनी तर आपले घर आरक्षित जागेत बांधले आहे. बेकायदेशीर काम करणे त्यांना शोभते का? जुळे सोलापुरातील आरक्षित जागेची फाईल माझ्याकडे आली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये हुकूमशाही सुरु आहे. 

लोकशाही पद्धतीने निवडणुका घ्या. लोकशाही दावणीला बांधताय का?, असा सवालही त्यांनी केला. सहकारमंत्र्यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावातून पिटाळून लावल्याची उदाहरणेही त्यांनी वाचून दाखविली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रकाश शेंडगे, जिल्हा निरीक्षक प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोलते-पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, उमेश पाटील, निर्मला बावीकर, सुनीता रोटे, मनोहर सपाटे, किसन जाधव, महेश गादेकर, जुबेर बागवान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित  होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAjit Pawarअजित पवारSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेस