शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजार संसर्गजन्य नाही; गैरसमज मात्र फार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:01 IST

जागतिक श्वेत त्वचा आजार दिन; भारतात दोन ते अडीच टक्के लोकांना श्वेत त्वचेचा आजार

ठळक मुद्देपांढरे पदार्थ खाल्ल्याने श्वेत त्वचा आजार होतो अशा प्रकारचा गैरसमज दूर होणे गरजेचे श्वेत त्वचा आजार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर लगेच उपचार घेणे गरजेचेश्वेत त्वचा आजार किंवा कोड याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही

शीतलकुमार कांबळे सोलापूर : श्वेत त्वचा आजार किंवा कोड याविषयी अनेक गैरसमज लोकांमध्ये आहेत. यापैकी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे श्वेत त्वचा आजार असलेल्या एखाद्या व्यक्तीस स्पर्श केल्याने दुसºया व्यक्तीस हा आजार होत नाही. त्वचेला रंग देणाºया मृत झाल्यास हा आजार जडतो; पण तो बरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

श्वेत त्वचा (कोड) आजार होणे याचे नेमके असे कारण नाही. हा आजार अनुवंशिक असतोच असेही नाही. जगभरात पांढरे डाग होण्याचे प्रमाण एक टक्का आहे. भारतात ते दोन ते अडीच टक्के आहे. हे डाग कधीच जन्मत: नसतात. ते कोणत्याही वयात होऊ शकतात. या डागांमुळे दुखणे, ताप येणे, स्राव होणे असा कोणताही त्रास होत नाही. शरीराच्या त्वचेला रंग देणाºया पेशी या कमी किंवा मृत झाल्या तर हा आजार होतो. शरीराच्या एका ठिकाणी हा आजार झाला तर तो पसरण्याची शक्यता फक्त एक टक्का असते. ९९ टक्के प्रकारात हा श्वेत त्वचा आजार पसरत नाही.

शरीराच्या संपूर्ण भागावर चट्टे असतील तर त्याला विटीलिगो वलगारीस तर फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगावर चट्टे असतील तर त्याला लिप टिप विटीलिगो असे म्हटले जाते. एकाच ठिकाणी आढळणारा चट्टा असेल तर त्याला लोकलाईज्ड विटीलिगो म्हणतात. जर का चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला अनस्टेबल विटीलिगो असे म्हणतात. 

या आजारात अनेक प्रकार आहेत. यात केसांमध्ये पांढरे चट्टे येणे, ओठांवर चट्टे येणे, पांढरे चट्टे पसरत जाणे आदी प्रकार आहेत. बºयाच जणांना श्वेत त्वचा आजार व कुष्ठरोग हा एकच आहे असे वाटते, पण कुष्ठरोग हा संसर्गजन्य रोग असून, श्वेत त्वचा आजार हा संसर्गजन्य नाही. औषधोपचार, लेसर, शस्त्रक्रिया, मलम लावणे या प्रकाराचे उपचार घेतल्याने हा आजार बरा होऊ शकतो. रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्याने त्वचेला रंग देणाºया पेशी कमी किंवा मृत होतात, यामुळेदेखील हा आजार होऊ शकतो.

श्वेत त्वचा आजार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यावर लगेच उपचार घेणे गरजेचे आहे. रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास हा आजार होत नाही. यासाठी सकस आहार घेणे, ध्यान करणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.  - डॉ. प्रकाश दुलंगे, त्वचारोग तज्ज्ञ

पांढरे पदार्थ खाल्ल्याने श्वेत त्वचा आजार होतो अशा प्रकारचा गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. हा आजार होऊ नये म्हणून पथ्य पाळण्याची आवश्यकता नाही. हा आजार झाल्यास उपचाराच्या अनेक पध्दती उपलब्ध आहेत. - डॉ. सचिन कोरे, त्वचारोग तज्ज्ञ

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य