शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी मजुरांनी शेतकऱ्यांची अडवणूक केली तर थेट कारवाई; साखर आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 09:09 IST

साखर आयुक्तांनी दिले राज्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना आदेश

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे कडून ऊस तोडणीसाठी ऊस उत्पादकांकडे पैशांची मागणी होत आल्यास थेट  कारवाई करा असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी  सर्वच सहकारी व खासगी साखर कारखान्यांना दिले आहेत. साखर आयुक्तांच्या या निर्णयाबाबत ऊस उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऊस तोडणी मजूर व मुकादम यांचे कडून ऊस तोडणीकरीता पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून साखर आयुक्त कार्यालयास मोठ्या प्रमाणात झाल्याने साखर आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना दिलेल्या आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणी करताना, पिक चांगले नाही, खराब आहे, ऊस पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी कारणे सांगून तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतक-यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालक यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी या कार्यालयास आल्या आहेत.

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. तसेच कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन व्हॉटसॅप क्रमांक जारी करावा व याबाबतची माहिती शेतकरयांना होणेकरिता प्रसिद्धी द्यावी. तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा वापर करावा. तक्रारीत मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा.असे आवाहन केले आहे.

  राज्यात चालू २०२१-२२ गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे चार ते पाच महिन्यांत गाळप होईल इतकी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता आहे. इथेनॉल उत्पादनासाठी साखर वळवली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचे संदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे 

........................................शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचेकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही. याची साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, कार्यकारी सचालक यांनी दक्षता घ्यावी. अशा स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करणेसाठी कारखान्यांनी तक्रारनिवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिका-यांची नेमणूक करावी. - पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक (साखर)

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणे