सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ दिलीप स्वामी; प्रकाश वायचळ यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 22:08 IST2020-11-10T19:35:43+5:302020-11-10T22:08:54+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ दिलीप स्वामी; प्रकाश वायचळ यांची बदली
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची बदली झाली असून त्यांच्या जागी दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश सायंकाळी प्राप्त झाला.
राज्यशासनाने राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी सायंकाळी जारी केले यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान सीईओ प्रकाश वायचळ यांच्या बदलीचा समावेश आहे त्यांच्या जागी नाशिक विभागात महसूल उपजिल्हाधिकारी पदी कार्यरत असलेले दिलीप स्वामी हे रुजू होणार आहेत. स्वामी हे लातूर जिल्ह्यातील तोंडार (ता. उदगीर) येथील आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाले होते. स्वामी यांनी राज्यभरात विविध शहर व जिल्ह्यात आपली सेवा बजावली आहे. त्यांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य शासनाने त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे.