शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

दिलीप मानेंनी दाखविले श्रेष्ठींकडे बोट; शेळके म्हणाले, विधानसभेला बंडखोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 4:18 PM

सोलापूर जिल्ह्यातील राजकारण; सोलापूर बाजार समिती सभापती निवडीनंतर राजकीय घडामोडींना आला वेग

ठळक मुद्देशिंदे यांनी शेळके तर पवार यांनी साठे यांच्याबद्दल शब्द दिला होताऐनवेळी झालेल्या घडामोडीत या दोघांनाही दूर ठेवण्याची खेळी अयशस्वी झालीपालकमंत्री देशमुख यांनी अंतर्गत राजकारणाला शह देत बहुमत जमविण्यात यश मिळविले

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीवर माजी आमदार दिलीप माने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर काँग्रेस गोटातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घातलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीत स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीमुळे भाजपचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सभापती झाले. शिंदे यांनी शेळके तर पवार यांनी साठे यांच्याबद्दल शब्द दिला होता. पण ऐनवेळी झालेल्या घडामोडीत या दोघांनाही दूर ठेवण्याची खेळी अयशस्वी झाली. 

पालकमंत्री देशमुख यांनी अंतर्गत राजकारणाला शह देत बहुमत जमविण्यात यश मिळविले. त्यामुळे शेळके व साठे नाराज झाले. सभापती निवडीवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार माने यांनी मी श्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा दिला. शेळके यांना सभापती करण्याची जबाबदारी श्रेष्ठींची होती असे म्हटले आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या या राजकीय खेळीवर टीका केली आहे. झेडपीचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, दिलीप माने यांनी आत्तापर्यंतच्या राजकारणात कोणतीच गोष्ट सरळ केली नाही. जाणीवपूर्वक त्यांनी बाजार समितीत राजकारण केले. आता वेळ आल्यावर आम्ही आमची ताकद दाखवू. 

श्रेष्ठींपुढे गाºहाणे मांडणार काय असे विचारले असता साठे म्हणाले, आता पोस्टमार्टेम करून काय साध्य होणार आहे. त्यामुळे संधीची वाट पाहणे हेच आता आमचे काम आहे असे उत्तर दिले. बाळासाहेब शेळके म्हणाले, माने यांनी दिलेला शब्द पाळला नाही. आता दक्षिण सोलापूरमधून त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी. विधानसभेला मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली नाही तर नाव सांगणार नाही. काँग्रेसचे नेते शिंदे यांचे निकटवर्तीय नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतही कोण किती निष्ठेने काम केले हे आम्ही पाहिले आहे. काँग्रेस संपविण्याचे काम सुरू असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. 

शिंदे यांच्या उपस्थितीत सोक्षमोक्षच्बाजार समितीमधील पराभवाची कारणमीमासा आता काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत केली जाईल असे एका नेत्याने सांगितले. विधानसभेला ही धोक्याची घंटा आहे. या पराभवाने अनेकांनी विधानसभा लढविणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. थेट शिंदे यांना टारगेट करण्याचे धैर्य आत्तापर्यंत कोणीच दाखविलेले नाही. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत यावर चिंतन करून निर्णय घेतला जाणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेSharad Pawarशरद पवार