शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिधीतून शिक्षकांनी बनवली डिजिटल शाळा; सोलापुरातील झेडपी शाळेचा लुक बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 15:36 IST

मुंडफणेवाडी झेडपी शाळा : टॅबलेट व स्मार्ट टीव्हीव्दारे डिजिटल अध्ययन

संदीप लोणकरश्रीपूर : कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना खूप अडचणी येत असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चाने मुलांसाठी टॅबलेट खरेदी करून शिक्षण देण्याचे काम चालू केले. कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेऊन फिजिकल डिस्टन्स ठेवून स्वतःच्या व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुलांना शिक्षण दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलांना शिक्षण तसेच पालकांना मार्गदर्शन केले. माळशिरस तालुक्यातील झेडपी शाळा मुंडफणेवाडीमधील शिक्षक समीर लोणकर व अर्चना वाघ यांनी शिक्षण अविरत चालू ठेवले आहे.

महाळुंग येथील मुंडफणेवाडी झेडपी शाळा असून, त्यामध्ये ३७ पट आहे. शाळेतील शिक्षकांनी मुलांना डिजिटल शिक्षण देण्यास भर दिला आहे. मुलांचे नुकसान होऊ नये व शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यासाठी टॅबलेट व स्मार्ट टीव्ही स्वखर्चाने खरेदी करून त्यामार्फत मुलांना डिजिटल शिक्षण देण्याचे काम केले जात आहे. कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद झाल्यामुळे शासनाने ऑनलाईन शिक्षण देण्यावर भर देण्यात आला असल्याचे मुख्याध्यापक समीर लोणकर यांनी यावेळी सांगितले.

गुणवत्ता वाढीसाठी ई-लर्निंगचा वापर...शाळेतील शिक्षकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. पण ग्रामीण भागांमध्ये मुलांना मोबाईल, इंटरनेटचा अतिरिक्‍त खर्च वाढत असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण देताना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे येथील शिक्षकांनी ऑफलाईन शिक्षण कसे देता येईल, त्यासाठी ऑफलाईन अभ्यासक्रम असणारा टॅबलेट खरेदी करण्यास विचार केला. या नव्या तंत्रज्ञानामुळे शिक्षण व अध्ययन आनंददायी झाले आहे. डिजिटल शाळेमध्ये संगणक ई-लर्निंग, स्मार्ट टीव्ही व टॅबलेट आदी सुविधा उपलब्ध केल्याने गुणवत्तावाढीसाठी ई-लर्निंगचा वापर चांगल्या पद्धतीने केला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक समीर लोणकर यांनी सांगितले.

 टॅबलेट खरेदीसाठी यांनी केली मदतयामध्ये कल्पना डोर्ले, पंकज व्होरा, नीलेश दोशी, संतोष कोरे आदी मित्रमंडळ, पालक, शिक्षक, रोटरी क्लब, अकलूज यांच्या मदतीने पंधरा टॅबलेट  खरेदी केले. यामधील शिक्षकांनी स्वनिधीतून दहा टॅबलेट घेतले आहेत.  

माझा मुलगा आरव हा झेडपी शाळा मुंडफणेवाडी या शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत आहे. वेगवेगळ्या खेळांमधून, कृतीमधून, टॅबलेटव्दारे शिक्षण देऊन मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, यासाठी ते प्रयत्न करत असतात.- पल्लवी अतुल शिंदेपालक, महाळूंग

टॅबलेटव्दारे अभ्यासात कार्टून असल्यामुळे आम्हाला तो धडा समजतो. त्यामध्ये सराव परीक्षा व खेळ असल्यामुळे जास्त मजा येते- वैभव चोरमले,विद्यार्थी, इयत्ता चौथी, झेडपी शाळा, मुंडफणेवाडी

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटलTeacherशिक्षक