धवलसिंह मोहिते पाटील यांची अन्नछत्रला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:20 IST2021-02-08T04:20:05+5:302021-02-08T04:20:05+5:30

चपळगाव : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट देऊन मंडळाच्या व्यवस्थापनाबाबत कौतुक केले. ...

Dhawal Singh Mohite Patil's visit to Annachhatra | धवलसिंह मोहिते पाटील यांची अन्नछत्रला भेट

धवलसिंह मोहिते पाटील यांची अन्नछत्रला भेट

चपळगाव : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच धवलसिंह मोहिते-पाटील यांनी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाला भेट देऊन मंडळाच्या व्यवस्थापनाबाबत कौतुक केले.

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जनसेवा संघटनेचे अभिराज शिंदे, सुधीरभाऊ लांडे, नितीन मोरे, सचिव श्यामराव मोरे, बाळासाहेब घाडगे, महांतेश स्वामी, एस.के. स्वामी, समर्थ घाडगे, प्रवीण घाडगे, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, प्रथमेश पवार, निखिल पाटील, गोविंदराव शिंदे उपस्थित होते.

--

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास गेल्या आठवड्यात मंत्रालयातील महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्नुषा नेहा देसाई, पुणे पालिकेचे नगरसेवक अविनाश बागवे, पुणे जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल अभंगे, सुप्रसिद्ध हास्य अभिनेते भाऊ कदम यांच्या पत्नी ममता कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे निरीक्षक भाऊ शेळके आदींनी भेट देऊन अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय महाराज भोसले व प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

---

फोटो : ०७ अन्नछत्र

अन्नछत्र मंडळाला भेट दिल्यानंतर धवलसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत करताना अमोलराजे भोसले.

Web Title: Dhawal Singh Mohite Patil's visit to Annachhatra