दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:36+5:302021-07-18T04:16:36+5:30

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी तर उपाध्यक्षपदी हमीद शेख यांची निवड करण्यात आली. कोतवाल ...

Dhanya Swami as the President of South Solapur Taluka Kotwal Association | दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी

दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी तर उपाध्यक्षपदी हमीद शेख यांची निवड करण्यात आली.

कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, रशीद हरकारे व सरचिटणीस अनिल जाधव यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या. प्रारंभी सुभाष शिंदे (मुस्ती), कृष्णा भाले (तोगराळी) आणि गुलाब शेख (हत्तूर) या सेवानिवृत्त कोतवालांचा सत्कार करण्यात आला.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष रेणुका कोळी, सरचिटणीस दत्ता कदम, कार्याध्यक्ष श्रीशैल हक्के, खजिनदार परमेश्वर बाईटपल्ली, संघटक भाऊ गायकवाड, प्रवक्ता पिंटू चव्हाण, मल्लिकार्जुन भुरळे प्रसिद्धिप्रमुख, सदस्य सचिन व्हनमाने, खंडू कुंभार, मल्लू कोळी, अप्पू कोळी, सिद्धू अर्जुने, अनिल कोकरे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, कोतवाल बांधवांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही निवडीनंतर अध्यक्ष स्वामी यांनी दिली.

--------

१७ धानय्या स्वामी

दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी यांची निवड झाली. त्यांचे स्वागत करताना विठ्ठल गुरव, रशीद हरकारे, अनिल जाधव.

Web Title: Dhanya Swami as the President of South Solapur Taluka Kotwal Association