आरक्षणासाठी आता धनगर संघर्ष सेनाही मैदानात; साेमवारी आंदाेलन
By राकेश कदम | Updated: January 25, 2024 18:16 IST2024-01-25T18:16:30+5:302024-01-25T18:16:46+5:30
साेमवारी आंदाेलन : समाज बांधवांना साेलापुरात एकत्र येण्याचे आवाहन

आरक्षणासाठी आता धनगर संघर्ष सेनाही मैदानात; साेमवारी आंदाेलन
धनगर संघर्ष सेनेच्या वतीने ओबीसी आणि धनगर आरक्षण बचावच्या मागणीसाठी साेमवारी माेर्चा आयाेजित करण्यात आला आहे. या माेर्चात समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष सेनेचे प्रमुख शेखर बंगाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले.
बंगाळे म्हणाले, शहरातील चार हुतात्मा चाैकातून साेमवारी २९ जानेवारी राेजी या माेर्चाला सुरुवात हाेईल. राज्य सरकारने सरकार विभागांमधील खासगीकरण आणि कंत्राटीकरण तत्काळ बंद करावे. ओबीसी आरक्षणात कुणाहीची घुसखाेरी हाेउ नये याची काळजी घ्यावी. सरकारने ओबीसीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात आदी या मागण्या या माेर्चातून मांडण्यात येणार आहे. प्रथम साेलापुरात आंदाेलन हाेईल. यानंतर विभागीय स्तरावर आणि मुंबईत आंदाेलन करण्यात येणार असल्याचे बंगाळे यांनी सांगितले. यावेळी प्रवीण चाफाकरंडे, श्रीधर साेनटकले, निमिषा वाघमाेडे, माधुरी पारपल्लीवार आदी उपस्थित हाेते.