शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

दोन मंत्र्यांच्या वादामुळे सोलापूरचा विकास खुंटला, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यु. एन. बेरिया यांचा आरोप, वरून दोस्ती, आतून कुस्ती चालूच राहणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:29 AM

आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केला. 

ठळक मुद्देनिवडणुकीपूर्वी भाजपने मोठ्या घोषणा केल्या. पण सत्तेवर आल्यावर लोकांची घोर निराशा केली : अ‍ॅड. बेरियादहा महिन्यात नगरसेवकांना निधी नाही, अत्यावश्यक कामे नाहीत. विकासकामाचा बोजवारा उडाला : अ‍ॅड. बेरियाआपसातील भांडण व राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १३  : सहकारमंत्री व पालकमंत्री गटातील वादामुळे दहा महिन्यात महापालिकेत एकही विकासाचे काम झाले नाही. दहापैकी केवळ दोन सभा झाल्या. या गटबाजीची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अ‍ॅड. यु. एन. बेरिया यांनी  पत्रकार परिषदेत केला. अ‍ॅड. बेरिया म्हणाले, निवडणुकीपूर्वी भाजपने मोठ्या घोषणा केल्या. पण सत्तेवर आल्यावर लोकांची घोर निराशा केली. दहा महिन्यात नगरसेवकांना निधी नाही, अत्यावश्यक कामे नाहीत. विकासकामाचा बोजवारा उडाला आहे. दोन मंत्र्यांच्या गटबाजीत साडेतीन वर्षे गेली आहेत. शहराच्या विकासासाठी त्यांनी कोणतीही महत्त्वाची योजना आणून कामास सुरुवात केलेली नाही. स्मार्ट सिटी योजनेचा फज्जा उडाला आहे. काँग्रेसची सत्ता असताना स्मार्ट सिटीसाठी निधी आला. पण आम्ही केलेले ठराव तीनवेळा विखंडित करावयास लावले. उड्डाणपूल, रस्ते या आधीच्याच योजना आहेत. स्मार्ट सिटीतून करण्यात येणारा रस्ता २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून संथपणे करण्यात येत आहे. दोन्ही मंत्र्यांची तोंडे दोन दिशेला आहेत. आपसातील भांडण व राजकारणामुळे शहराचा विकास खुंटला. मुख्यमंत्र्यांना यांच्या भांडणाची दखल घ्यावी, हे सोलापूरचे दुर्दैव म्हणावे लागेल. इतके करूनही यांच्यात एकी होणार नाहीच. वरून दोस्ती, आतून कुस्ती असे यांचे राजकारण चालणारच. याउलट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार, गृहमंत्री असताना विविध योजनेतून ५६ कोटी, अनुदानातून ४० कोटी, महसूल निधीतून १५५१ कोटी, भांडवली निधीतून १२८८ कोटी अशी २९३५ कोटींची विकासकामे केली आहेत. आता भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटी योजनेचा निधी येऊनही कामे मार्गी लावली जात नाहीत. काम करून घेण्यासाठी सत्ताधाºयांचा प्रशसनावरील वचक कमी असल्याचे हे द्योतक असल्याचा आरोप अ‍ॅड. बेरिया यांनी केला.---------------------आताच का कळवळा- अ‍ॅड. बेरिया यांच्या आरोपाचा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर जामगुंडे यांनी समाचार घेतला आहे. असे सर्वच पक्षात चालते. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यावर बेरियांना गटबाजीचा का कळवळा आला, असा त्यांनी सवाल केला. १३ जानेवारीनंतर पाहा महापालिकेच्या कामकाजात फरक झालेला दिसेल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका