फेसबुक स्नेहींचा निर्धार; नातलग अन् मित्रांशी सोलापूरच्या बलस्थानांवर बोलूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 03:12 PM2019-03-27T15:12:15+5:302019-03-27T15:15:37+5:30

पुन्हा एकदा एकत्र येऊन ‘मी सोलापूरकर’ म्हणून नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार केला.

Determined for Facebook friends; Talk to relatives and friends at Solapur ... | फेसबुक स्नेहींचा निर्धार; नातलग अन् मित्रांशी सोलापूरच्या बलस्थानांवर बोलूया...

फेसबुक स्नेहींचा निर्धार; नातलग अन् मित्रांशी सोलापूरच्या बलस्थानांवर बोलूया...

Next
ठळक मुद्देफेसबुक स्नेहींचा मेळावा रंगभवनजवळील समाजकल्याण सभागृहात पार पडलाजर मार्केटिंग झाले तर जगाच्या नकाशावर सोलापूरचं नाव उमटेलपुन्हा एकदा एकत्र येऊन ‘मी सोलापूरकर’ म्हणून नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार करून परतले.

सोलापूर : हजारो वर्षांचा वारसा जपलेल्या आपल्या शहराचं महत्त्व.. इथल्या प्रसिद्ध वास्तू, खाद्यपदार्थ असे जे जे काही असेल त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची एक सोलापूरकर म्हणून आपलं कर्तव्य आहे. नुसतंच गिरणगाव म्हणून नाही तर इथल्या संपन्न शहराबद्दल बाहेरून शहरात येणारे आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवारांशी आपल्या कडक भाकरी-चटणीपासून येथील कॅमशाफ्टस्, अमाईन्स अन् पंपनिर्मिती उद्योगांवर बोलून शहराचं वैभव सातासमुद्री पोहोचवण्यासाठी डंका वाजवू या, असा निर्धार फेसबुक स्नेही सोलापूरकरांनी रविवारी मेळाव्यात केला. यावेळी सोलापूरच्या ब्रँडिंगसाठी ‘लोकमत’ने घेतलेल्या भूमिकेचीही प्रशंसा करण्यात आली.

फेसबुक स्नेहींचा मेळावा रंगभवनजवळील समाजकल्याण सभागृहात पार पडला.  यावेळी अरविंद जोशी, गोविंद काळे, विजयकुमार देशपांडे, मोहिनी पिटके, मिलिंद भोसले, राज साळुंखे, हिंदुराव गोरे, सुहास भोसले, विद्या भोसले, मदन पोलके, शरणप्पा फुलारी, मुकुंद शेटे, अमित कामतकर, आतिश शिरसट, महेश कासट, बसवराज बिराजदार, मनोज देवकर, तुकाराम चाबुकस्वार, राजेश काथवटे, वागेश शास्त्री, सचिन पांढरे, अभिजित भडंगे,आदींनी भावना व्यक्त केल्या. 

‘वेकअप सोलापूर फाउंडेशन’च्या या व्यासपीठावरून सोलापूरकरांना हाक देण्याचा प्रयत्न करणाºया मिलिंद भोसले यांनी सोलापूरच्या विकासासाठी आपण सर्वांनीच एकत्र यायला हवं. 

सोलापूरची अनेक मंडळी भारतभरच काय जगभर आपला ठसा उमटवत आहेत. अगदी मंत्रालयामध्ये अनेक उच्चपदस्थ मंडळी आहेत. त्यांच्याशी आपले यावर बोलणेही झाले आहे. प्रत्येक पातळीवर त्यांची मदत घेऊन काय करता येईल याचा विचार झाला पाहिजे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी पन्नास बिनभांडवली व्यवसायावर भाष्य करताना बेरोजगारांनी स्वावलंबी बनण्यासाठी याचा फार मोठा फायदा होऊ शकतो. याबद्दल उदाहरण देताना त्यांनी सध्या लोकसभेचे वारे वाहू लागले आहेत. मतदानाच्या वेळी बुथनिहाय एखादा वडापावचा गाडा जरी टाकला तरी यातून एक दिवसातून किमान चार ते पाच हजारांचा व्यवसाय होऊ शकतो.  हा मेळाव्याच्या आयोजनासाठी निसर्ग माझा परिवाराचे समन्वयक अरविंद म्हेत्रे यांनी पुढाकार घेतला. 

पुन्हा एकत्र येऊ यात !
- पर्यटनाला पोषक असणाºया आपल्या जिल्ह्यात अनेक धार्मिक, प्रेक्षणीय स्थळे आहेत. समृद्ध वारसा आहे. या बाबींचं जर मार्केटिंग झाले तर जगाच्या नकाशावर सोलापूरचं नाव उमटेल, शिवाय यातून रोजगार निर्मितीचं साधनही उपलब्ध होऊ शकतो, यावरही अनेकांनी प्रकाश टाकला. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी असल्याने प्रत्येकाने नवीन विषयांची मांडणी केली. पुन्हा एकदा एकत्र येऊन ‘मी सोलापूरकर’ म्हणून नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार करून परतले. 

‘लोकमत’ इनिशिएटीव्हची दखल
- स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सहभागी असलेले वेकअप फाउंडेशनचे मिलिंद भोसले यांनी वाया जाणाºया पाण्याबद्दल ‘लोकमत’ने मांडलेल्या आग्रही मुद्यामुळे महापालिकेलाही दखल घ्यावी लागली. प्रसार माध्यमांनीही सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने सामाजिक प्रश्न उचलावेत. माध्यमांमुळे अनेक प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Determined for Facebook friends; Talk to relatives and friends at Solapur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.