मृतदेहाची विटंबना होता कामा नये; बिलासाठी प्रेत अडविल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 12:30 PM2020-06-20T12:30:01+5:302020-06-20T12:36:34+5:30

पालकमंत्री दत्तात्रय भरणे; ‘लोकमत’ च्या वृत्ताची घेतली दखल

The desecration of the corpse was not to be done; Action if the corpse is blocked for the bill | मृतदेहाची विटंबना होता कामा नये; बिलासाठी प्रेत अडविल्यास कारवाई

मृतदेहाची विटंबना होता कामा नये; बिलासाठी प्रेत अडविल्यास कारवाई

Next
ठळक मुद्देकोरोना रुग्णांची महापालिकेकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी व विभागीय आयुक्तांकडे असलेल्या माहितीत फरक महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी खासगी रुग्णालयाकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अशी गडबड होत असल्याचे स्पष्ट केलेजिल्ह्यात १८९७  कोरोना रुग्ण आढळले व यातील ९७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७२ रुग्णांवर उपचार सुरू

सोलापूर: मृतदेहाची विटंबना होता कामा नये. महापालिकेच्या आधिकाºयांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे़ खासगी रुग्णालयांनी बिलासाठी मृतदेहाची अडवणूक केल्यास कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकाºयांना दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

‘एकीकडे अंत्यसंस्कार होत असताना दुसरीकडे घरात ‘तिसरा’चा विधी’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या हॅलो सोलापूर पुरवणीत १८ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीकडे लक्ष वेधले असता पालकमंत्री भरणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची सूचना केली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी सोलापूर दौºयावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहरात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत, याबाबत समाधान व्यक्त केले. सर्व अधिकारी चांगले काम करीत आहेत व नागरिक फिजिीकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत असल्याने फरक जाणवत आहे. शहरातील बरेच भाग कोरोनामुक्त होत आहेत. पण याबाबत बेफिकीर राहून चालणार नाही. कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्व गोष्टींचे पालन होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

शहरात अद्यापही काही रुग्णालये बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देत नाहीत, याकडे लक्ष वेधल्यावर पालकमंत्री भरणे यांनी ही बाब अत्यंत गंभीर आहे. मृतदेहाची विटंबना होता कामा नये. मनपाच्या अधिकाºयांनी यात लक्ष घालून काय अडचणी आहेत, हे तपासून प्रश्न निकाली काढला पाहिजे. जिल्हाधिकाºयांनी यात लक्ष घालावे, अशी सूचना केली.

खासगी रुग्णालयांकडून होतोय विलंब
कोरोना रुग्णांची महापालिकेकडून प्रसिद्ध होणारी आकडेवारी व विभागीय आयुक्तांकडे असलेल्या माहितीत फरक असल्याचे निदर्शनाला आणल्यावर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी खासगी रुग्णालयाकडून माहिती येण्यास विलंब होत असल्याने अशी गडबड होत असल्याचे स्पष्ट केले.  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांना गुरुवारी माहिती देताना जिल्ह्यात १८९७  कोरोना रुग्ण आढळले व यातील ९७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे सांगितले.

Web Title: The desecration of the corpse was not to be done; Action if the corpse is blocked for the bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.