करमाळा उपजिल्हा रुग्णालयासाठी ६० कोटी निधीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:25+5:302021-06-06T04:17:25+5:30
करमाळा तालुक्यातील जनतेला आरोग्यसेवा पुरविणारे उपजिल्हा रुग्णालय हे महत्त्वाचे शासन माध्यम आहे. रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी २०१४ ते २०१९ दरम्यान पाठपुरावा ...

करमाळा उपजिल्हा रुग्णालयासाठी ६० कोटी निधीची मागणी
करमाळा तालुक्यातील जनतेला आरोग्यसेवा पुरविणारे उपजिल्हा रुग्णालय हे महत्त्वाचे शासन माध्यम आहे. रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी २०१४ ते २०१९ दरम्यान पाठपुरावा केला. काही पायाभूत कामांना मंजुरी मिळविली. सध्या हे रुग्णालय ५० खाटांचे असून, ते १०० खाटांत रूपांतर व्हावे यासाठी ३६ कोटी २३ लक्ष ३९,७६० इतक्या निधीची आवश्यकता आहे. बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे. यानंतर निधीची तरतूद होणे गरजेचे आहे.
१०० खाटांच्या रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचे काम १५ जुलै २०१९ रोजी आरोग्य विभागाने एका शासन निर्णयाद्वारे यापूर्वीच करून ठेवल्याने आता हे काम पूर्ण होण्यासाठी नारायण पाटील हे पाठपुरावा करीत आहेत. तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० खाटांवरून १०० खाटांच्या श्रेणीवर्धन प्रस्तावास मान्यता दिली होती.
आरोग्यविभागातील कर्मचारी निवासी सोयीपासून वंचित आहेत. यासाठी उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकाम अंदाजपत्रकास तातडीने प्रशासकीय मान्यता मिळाली जावी. सध्या कर्मचारी हे धोकादायक इमारतीत वास्तव्य करीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.