बँकेने शेतीवर चढवलेला बोजा कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:16 AM2021-06-20T04:16:43+5:302021-06-20T04:16:43+5:30

रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन देण्यात आले. शिरवळ (ता. अक्कलकोट) येथील शेतकरी नारायण हळ्ळुरे ...

Demand for reduction of burden on agriculture by the bank | बँकेने शेतीवर चढवलेला बोजा कमी करण्याची मागणी

बँकेने शेतीवर चढवलेला बोजा कमी करण्याची मागणी

Next

रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली मागणीचे निवेदन देण्यात आले. शिरवळ (ता. अक्कलकोट) येथील शेतकरी नारायण हळ्ळुरे यांची सदलापूर येथे शेतजमीन (गट नंबर २३५) आहे. त्यांनी ३१ मार्च २००९ रोजी तडजोडीने कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड केली होती. या कर्जाची कोणत्याही प्रकारची येणे बाकी नाही असे पत्र बँकेकडून यापूर्वीच दिले आहे. २ मे, २००९ रोजी बोजा कमी करण्यात आला. त्यानंतर १ जून २०२१ रोजी शेतक-यास ताबा मागणी नोटीस दिली आहे. पुन्हा त्याच शेतजमीन गटावर बोजा चढविला आहे.

अक्कलकोट तालुक्यात २५० शेतक-यांवर अशाच प्रकारे बँक अन्याय करीत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर, अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मरोड, स्वामी समर्थ बँकेचे अवसायक दत्ता मोरे यांनी शेतक-यांच्या शेतजमिनीवरील बोजा कमी करावा अशी मागणी केली आहे. येत्या आठ दिवसांत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी अवसायक एम. डी. वांजरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी सोपान गायकवाड, आप्पा भालेराव, राजू भगळे, अंबादास गायकवाड, सूरज सोनके, प्रसाद माने, चंद्रकांत गायकवाड, विजयकुमार गायकवाड, किरण गायकवाड, अनिल दसाडे, नितीन इसामंत्री, नारायण हळ्ळुरे, आप्पाशा देवकर, भीमाशंकर गायकवाड, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते.

---

फोटो : १९ अक्कलकोट शेती

बँकेच्या अवसायकांना निवेदन देताना अविनाश मडीखांबे, नारायण हळ्ळुरे, आदी जण दिसत आहेत.

Web Title: Demand for reduction of burden on agriculture by the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.