टँकर घोटाळ्यात कागदपत्रे देण्यास सोलापूर महापालिकेच्या अधिकाºयांकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:57 IST2019-02-15T13:56:22+5:302019-02-15T13:57:58+5:30

सोलापूर : महापालिकेच्या झोन कार्यालयांमध्ये झालेल्या टॅँकर घोटाळ्याच्या तपासात कागदपत्रे देण्यास झोन अधिकाºयांनी टाळाटाळ सुरू केली आहे. या प्रकरणातील ...

Delayed by officials of Solapur district to issue documents in the Tanker scam | टँकर घोटाळ्यात कागदपत्रे देण्यास सोलापूर महापालिकेच्या अधिकाºयांकडून विलंब

टँकर घोटाळ्यात कागदपत्रे देण्यास सोलापूर महापालिकेच्या अधिकाºयांकडून विलंब

ठळक मुद्देप्रशासनाने सेवानिवृत्त अधिकारी बी. सी. हंगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली टॅँकर घोटाळ्याच्या तपासात कागदपत्रे देण्यास झोन अधिकाºयांनी टाळाटाळ सुरू केली

सोलापूर : महापालिकेच्या झोन कार्यालयांमध्ये झालेल्या टॅँकर घोटाळ्याच्या तपासात कागदपत्रे देण्यास झोन अधिकाºयांनी टाळाटाळ सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे एक मार्चपर्यंत सादर करावीत, अन्यथा तुमच्याविरोधात अहवाल देण्यात येईल, असा इशारा चौकशी अधिकाºयांनी दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. 

टॅँकर घोटाळ्याच्या चौकशीसाठी प्रशासनाने सेवानिवृत्त अधिकारी बी. सी. हंगे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. हंगे यांनी बुधवारी सोलापुरात झोन अधिकाºयांची बैठक घेतली. शहरातील पाणी टंचाईच्या काळात अनेक भागात भाड्याने टॅँकर लावण्यात आले होते.

या टॅँकरच्या जादा फेºया दाखवून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपा नगरसेवकाने केला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महापालिकेच्या मुख्य लेखापालांना बिले तपासण्याचे आदेश दिले. यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त अधिकारी हंगे यांची नियुक्ती करण्यात आली. हंगे यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, पण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने अहवाल देण्यास विलंब होईल, असे हंगे यांनी सांगितले. 

हंगे यांनी बुधवारी आठ झोन अधिकाºयांसोबत बैठक घेतली. एका टॅँकरला किती फेºया करण्याचे आदेश होते. प्रत्यक्षात किती करण्यात आले. फेरआढावा कोणी घेतला. याबाबत कागदपत्रांची मागणी केली. परंतु, अनेक झोन अधिकाºयांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यावर हंगे यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाºयांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वेळेवर कागदपत्रे सादर करावीत, अन्यथा या प्रकरणाला तुम्हीच जबाबदार आहात, असा अहवाल देण्यात येईल, असे त्यांनी सांगितल्याचे प्रशासनातून सांगण्यात आले. 

Web Title: Delayed by officials of Solapur district to issue documents in the Tanker scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.