सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी दिपक तावारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 16:14 IST2019-02-20T16:11:13+5:302019-02-20T16:14:42+5:30
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी पुणे येथील मार्केटिंगचे संचालक दिपक तावारे याची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ...

सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी दिपक तावारे
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी पुणे येथील मार्केटिंगचे संचालक दिपक तावारे याची नियुक्ती करण्यात आली.
तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची जळगांव येथे जिल्हाधिकारी या पदावर बदली झाली होती. त्यांनी पदभार सोडल्यानंतर महापालिकेची कामे खोळंबली होती. तात्पुरता पदभार सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्याकडे देण्यात आला होता.
दरम्यान, राज्य शासनाने बुधवारी दुपारी राज्यातील अनेक आयएसए अधिकाºयांच्या बदल्या केल्या. त्यात पुणे येथील दिपक तावारे यांची सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तावारे हे लवकरच पदभार घेणार असल्याचे विश्वनीय सुत्रांनी सांगितले.