राेपळेत ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:28 IST2021-08-18T04:28:14+5:302021-08-18T04:28:14+5:30

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील रोपळे येथील ग्रामस्थांनी लावलेल्या साडेसात हजार झाडांच्या ऑक्सिजन पार्कचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध ...

Dedication of Oxygen Park in Rapal | राेपळेत ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

राेपळेत ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील रोपळे येथील ग्रामस्थांनी लावलेल्या साडेसात हजार झाडांच्या ऑक्सिजन पार्कचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते झाला. तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोविड योद्धयांच्या सन्मान करण्यात आला.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भोसले, डॉ. डी. वाय. पाटील पुणे येथील नेत्र विभागप्रमुख डॉ. संतोषकुमार मस्तुद, संजय फरतडे, अतुल फरतडे, सूरज जगताप, अतुल पाटील, रामभाऊ जगताप, तरंगे महाराज, सरपंच वैशाली गोडगे, उपसरपंच महानंदा पाटील, माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे, माजी उपसरपंच शरद पाटील, तानाजी दास, हर्षल वाघमारे, तंटामुक्तचे अध्यक्ष नाना दास, जगदीशराजे निंबाळकर, आमिर मुलानी, किरण सुतार, विनोद वाघमारे, अण्णासाहेब पवार, सुधीर गोडगे, सत्तार मुलानी, भरत कुंभार, सूर्यकांत गोडगे, नागनाथ साळवे, तानाजी साळवे, दत्तात्रय तळेकर आदी उपस्थित होते.

...............

फोटो : १७ कुर्डूवाडी २

रोपळे येथे ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, डॉ. भोसले, डॉ. संतोषकुमार मस्तूर, संजय फरतडे, अतुल फरतडे

170821\img-20210816-wa0271.jpg

रोपळे ता माढा येथील ७.५ हजार झाडांच्या ऑक्सिजन पार्कचे लोकार्पण करताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,सरपंच वैशाली गोडगे,यावेळी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ

Web Title: Dedication of Oxygen Park in Rapal