मोडनिंब येथे ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:24 IST2021-05-25T04:24:56+5:302021-05-25T04:24:56+5:30

रुग्णांना ऑक्सिजन सुविधेसह रुग्णालयात पोहोच करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रुग्णवाहिका तयार करण्यात आली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेमध्ये एकाच वेळेस ...

Dedication of Oxygen Ambulance at Modenimb | मोडनिंब येथे ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

मोडनिंब येथे ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण

रुग्णांना ऑक्सिजन सुविधेसह रुग्णालयात पोहोच करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने रुग्णवाहिका तयार करण्यात आली. विशेष म्हणजे या रुग्णवाहिकेमध्ये एकाच वेळेस तब्बल दोन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठासह रुग्णालयापर्यंत पोहोच करता येऊ शकते. त्याच रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मोडनिंब येथे पार पडला.

यावेळी मनसेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मोडनिंबचे उपसरपंच दत्ता बापू सुर्वे, सिद्धेवाडीचे उपसरपंच दाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कुरण गिड्डे, सोमनाथ माळी सदाशिव पाटोळे,प्रवीण खडके, राजू निंबालकर, अजित खडके, महादेव मांढरे, राहूल सुर्वे, किरण खडके, निखिल गिड्डे, फिरोज मुजावर, दीपक गिड्डे उपस्थित होते.

---

फोटो २४ मोडनिंब ऍम्ब्युलंस

ओळ : मोडनिंब येथे ऑक्सिजन रुग्णवाहिकेचे लोकार्पण मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यासह पदाधिकारी.

Web Title: Dedication of Oxygen Ambulance at Modenimb