शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शैक्षणिक संस्थानी केले शासनाकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 13:13 IST

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न : सोलापुरातील प्रशासनाने सुरक्षेची हमी घेण्याची मागणी 

रुपेश हेळवे

सोलापूर :  नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर महाविद्यालय सुरू होण्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हजेरी पाहता सध्या महाविद्यालये सुरू करणे हे घाईचे ठरेल, तरीही प्रशासनाने महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्यास आम्ही त्याचे पालन करू, असे मत व्यक्त करीत महाविद्यालये व विद्यापीठाने राज्य शासनाकडे बोट केले आहे.

ज्या राज्यात शाळा सुरू झाल्या त्यातील काही राज्यात कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढल्याचे लक्षात येत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळेच खूप कमी प्रमाणात पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले आहे. ही संख्या लक्षात घेता महाविद्यालये सध्या सुरू न करता ऑलनाईन शिक्षण घेणे उत्तम असल्याचे मत काही प्राध्यापक व्यक्त करत आहेत. कॉलेज जरी बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबलेले नाही. मोठ्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. यामुळे अडीच-तीन हजार विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे हे अवघड असणार आहे. यामुळे सध्या ज्युनिअर कॉलेजचा प्रयोग चांगला वाटला तर टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरू करण्यास अडचण नाही, असे मत कीर्ती पांडे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्यकेंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ अनुदान आयोग आणि विद्यापीठाने महाविद्यालये सुरू करण्यास सांगितले तर आम्ही यासाठी तयार आहेत. पण विद्यार्थ्यांची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे, त्यांच्या सुरक्षिततेला आम्ही प्रथम प्राधान्य देऊ. यात पालकांचा निर्णयही खूप महत्त्वाचा आहे. - अंबादास देशमुख, अध्यक्ष, प्राचार्य संघटना 

 कोणत्याही सुचना मिळाल्या नाहीत...सध्या कोरोना स्थितीमुळे महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय राज्य शासन आणि शिक्षण मंत्री घेतील. त्यांच्या सूचना आल्यानंतर आम्ही त्यांच्या सूचनेनुसार पुढील कामे करू. अद्यापपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणत्याही सूचना आम्हाला मिळालेल्या नाहीत. - मृणालिनी फडणवीस    कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

प्रशासनाने साेय करावीप्राध्यापक ऑनलाईन शिक्षण नाईलाजाने देत आहेत. ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन  शिकविणे आम्हाला आणि विद्यार्थ्यांना सोयीस्कर आहे. प्रशासन आणि महाविद्यालयांनी आम्हाला हजर राहण्याच्या सूचना केल्या तर आम्ही तत्काळ हजर राहू. पण विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सुरक्षिततेची प्रशासनाने सोय करणे गरजेचे आहे.- भगवान अदटराव,कार्यकारिणी सदस्य, सुटा संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी