सोलापूर : गेले अनेक दिवसांपासून ‘कोरोनामुक्त’ जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया सोलापुरात अखेर एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर हा अहवाल यंत्रणेच्या हाती पडल्यामुळे गांभीर्य अधिकच वाढले आहे. रविवारी दुपारपासून जोडबसवण्णा चौकातील प्रार्थनास्थळ परिसरात अकस्मातपणे पोलिसांच्या अन् महसूल अधिकाºयांच्या गाड्यांचा ताफा आला, तशी या ठिकाणी लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. डॉक्टरांची टीमही घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान, या प्रार्थनास्थळाजवळील एका किराणा दुकानदाराचा नुकताच मृत्यू झाला असून, त्याच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. सदर किराणा दुकानदार गेल्या काही दिवसांपासून कुणाकुणाच्या संपर्कात आला होता, याची चौकशी पोलीस खाते कसोशीने करीत आहे. तर संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला डॉक्टरांच्या ताब्यात दिले जात आहे. पुढील १४ दिवसांसाठी या किराणा दुकानदाराशी संबंधित परिसर सील करण्यात आला असून, त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास सर्वांनाच क्वारंटाईनमध्ये दाखल केले जाईल.
सोलापुरातील मृत व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 19:29 IST
यंत्रणा सतर्क; जोडबसवण्णा चौकातील परिसर सील
सोलापुरातील मृत व्यक्तीचा अहवाल आला पॉझिटिव्ह
ठळक मुद्देसोलापुरातील जोडबसवण्णा चौक पोलिसांनी केला सीलकोरोनाच्या लढ्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्जपुरेसा औषध साठा व हॉस्पिटलची यंत्रणा सज्ज