शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील जीवघेण्या ३२ ‘ब्लॅक स्पॉट’वर १२८७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 11:34 IST

वाढते शहर, वाढती वाहने लक्षात घेता सध्या अपघाताचे प्रमाण वाढले

ठळक मुद्देअपघातांच्या संख्येनुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २५ ब्लॅक स्पॉट निश्चितशहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १९ ब्लॅक स्पॉट निश्चितदिवसेंदिवस हे ब्लॅक स्पॉट मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत

संताजी शिंदे सोलापूर : एका ठिकाणी तीन वर्षांत दहापेक्षा जास्त अपघात झाले असतील अन् त्यात तीनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्यास त्याला अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखले जाते. शहर-जिल्ह्यातील एकूण ३२ ब्लॅक स्पॉटवर गेल्या दोन वर्षांत एक हजार २८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस हे ब्लॅक स्पॉट मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत. 

वाढते शहर, वाढती वाहने लक्षात घेता सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १९ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. या भागात सातत्याने अपघात होत असून, अनेक वाहन चालकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या गंभीर अपघातांमध्ये २०१८ मध्ये ९७ तर २०१९ मध्ये ८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीत राष्ट्रीय व राज्य महामार्गावर एकूण १३ ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. २०१८-२०१९ या दोन वर्षांच्या कालावधीत एकूण दोन हजार १०९ अपघात झाले आहेत. अपघातामध्ये एकूण एक हजार १०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. 

८० टक्के उपाययोजना केल्या : मनोज पाटील२०१४, २०१५, २०१६ च्या अपघातांच्या संख्येनुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात २५ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले होते. २०१६ ते २०१८ दरम्यान एकूण १३ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. ब्लॅक स्पॉट ठिकाणी आरटीओ सोलापूर व आरटीओ अकलूज यांच्याकडील अधिकारी तसेच नॅशनल हायवे अधिकारी यांच्यासमवेत अपघाताचे प्रमाण कमी करण्याकामी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना अंशकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. बºयाच ठिकाणी ८० टक्के उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. 

शहरातील ब्लॅक स्पॉट...- शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत केगाव, जुना पुणे नाका (पुणे राष्ट्रीय महामार्ग), एस.टी. स्टॅन्ड, सात रस्ता, जुना विजापूर नाका, आयटीआय पोलीस चौकी, इंचगिरी मठ, सैफुल, एसआरपी कॅम्प, सोरेगाव, हत्तूरगाव, शांती चौक अक्कलकोट रोड, जुना अक्कलकोट नाका, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड, हैदराबाद रोड, मुळेगाव क्रॉस रोड, जुना तुळजापूर नाका, देगाव टोलनाका.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस