शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर आजारी पडलेल्या सोलापूरमधील विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:39 IST

सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.

सोलापूर : सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण केमिकल अ‍ॅनालिसीस अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.ऋषिकेश हा औज (आ) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. शुक्रवारी दुपारी त्याला लस टोचण्यात आली. त्यानंतर त्याला उलटी झाली. सायंकाळी पुन्हा त्याला उलटी झाली व ताप आला. आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ऋषिकेशला सोलापूर शासकीय रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती बरी होती. शनिवारी पहाटे ३.३० वाजता ऋषिकेश बेडवरून उठला व आईच्या कुशीत जाऊन झोपला. मात्र त्यावेळी त्याचे शरीर पूर्ण थंड पडले होते. आई शोभा डोंबाळे यांनी संबंधित डॉक्टर व नर्सना कल्पना दिली. त्यानंतर ऋषिकेशला आयसीयूमध्ये हलवण्यात आले आणि व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर तीन दिवस तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर सोमवारी रात्री डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे जाहीर केले. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पालकमंत्री देशमुख यांनी ऋषिकेशच्या कुटुंबियाची भेट घेऊन कुटुंबियास पाच लाख रुपये आणि नोकरीचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंसंस्कार करण्यात आलेभंडाऱ्याच्या चिमुकलीचाही मृत्यूनागपूर : भंडारा येथील आराध्या वाघाये या ११ महिन्याच्या चिमुकलीचाही लस दिल्यानंतर मृत्यू झाला. आराध्याला ५ डिसेंबर रोजी गोवर-रुबेलाची लस देण्यात आली. ६ तारखेला तिची प्रकृती खालवल्यामुळे तिला ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून नागपूर येथील मेडिकलमध्ये भरती केले. ७ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू लसीकरणामुळे झालेला नाही, शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. आणखी एका दहा वर्षाच्या मुलावरही मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयSolapurसोलापूर