दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 16:05 IST2023-08-22T16:05:06+5:302023-08-22T16:05:34+5:30

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील सोमनाथ माने या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर माने यांच्या नातेवाईकांनी विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

Death of one in Palashi after drinking alcohol; Villagers Aggressive with Relatives Against Poisonous Liquor | दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक

दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक

पंढरपूर : पळशी (पंढरपूर) येथे दारू पिऊन एकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी अवैध विषारी दारूच्या विरोधात ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.

पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील सोमनाथ माने या तरुणाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर माने यांच्या नातेवाईकांनी विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

तसेच अवैद्य दारू विक्री बंद झाल्याशिवाय तिसऱ्या दिवसाचा विधी न करण्याचा नातेवाईकांचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर अवैध विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायत समोर आंदोलन केले आहे.

Web Title: Death of one in Palashi after drinking alcohol; Villagers Aggressive with Relatives Against Poisonous Liquor