गतिराेधकावर आदळून विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:22 IST2021-03-31T04:22:39+5:302021-03-31T04:22:39+5:30

अक्कलकोट : डिग्गेवाडी (ता. अक्कलकोट) येथे बसवण्यात आलेल्या गतिरोधकावर आदळून मोटारसायकलवरील विवाहित जागेवर मरण पावली. या घटनेनंतर या महिलेच्या ...

Death of a married woman after colliding with a speed bump | गतिराेधकावर आदळून विवाहितेचा मृत्यू

गतिराेधकावर आदळून विवाहितेचा मृत्यू

अक्कलकोट : डिग्गेवाडी (ता. अक्कलकोट) येथे बसवण्यात आलेल्या गतिरोधकावर आदळून मोटारसायकलवरील विवाहित जागेवर मरण पावली. या घटनेनंतर या महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत गतिरोधकप्रकरणी ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नातेवाईकांचा आक्रमकपणा पाहता अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मीबाई शिवप्पा भालके ( वय ४२ रा स्वामी समर्थ नगर, पाण्याचे टाकी जवळ,अक्कलकोट) असे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव असून ३० मार्च रोजी सकाळी ९ वाजता हा अपघात घडला.

मृत लक्ष्मीबाई आणि बहिणीचा मुलगा काशिनाथ बेडगे (रा.चप्पळगाव) हे दोघे दुचाकी मोटारसायकल (एम. एच. १३, टी. आर. ४७३१) वरुन डबल सीट प्रवास करीत होते. चडचण (इंडी) येथे अंत्यविधीसाठी निघाले होते. दरम्यान डिग्गेवाडी येथे मोटारसायकल येताच गतिरोधकावर दुचाकी आदळली. गतिरोधकावर पांढरी पट्टी नसल्याने दुचाकी चालकाच्या निदर्शनास आला नाही. या गतिरोधकावर गाडी आदळताच मागे बसलेल्या लक्ष्मीबाई भालके यादेखील आदळून पडल्या.

या अपघातादरम्यान जवळ तांडा परिसरातून त्यांच्या मदतीला सुशीला राठोड आणि कविता राठोड या दोन महिला धावून आल्या. लक्ष्मीबाईला अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सध्या अक्कलकोट ते अक्कलकोट स्टेशन हा रस्ता तयार होत आहे. डिग्गेवाडी येथे तयार करण्यात आलेले गतिरोधक हे अवैध आहे. त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही. संबंधित ठेकेदाराच्या चुकीमुळे मोटारसायकल गतिरोधकावर आदळून विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

---

काही वेळ वातावरण तापले

या घटनेनंतर अपघातस्थळी लक्ष्मीबाईचे नातेवाईक जमा झाले आणि रस्त्याचे काम बंद राेखून धरले. जो पर्यंत ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यानंतर ठेकेदार एस. एम. अवताडे यांच्यावर विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नातेवाईकांच्या या भूमिकेमुळे काही वेळ वातावरणात तापले होते. या अपघातात मयत लक्ष्मीबाई यांचा मुलगा बसवराज भालके यांनी फिर्याद दिली आहे.

---

३० लक्ष्मीबाई भालके

Web Title: Death of a married woman after colliding with a speed bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.