दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचे दागिने हस्तगत
By Appasaheb.patil | Updated: May 29, 2023 18:20 IST2023-05-29T18:20:09+5:302023-05-29T18:20:27+5:30
त्यांनी कबूल केल्याप्रमाणे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

दिवसा घरफोडी करणारा आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगार जेरबंद; ११ गुन्हे उघडकीस, सव्वा पाच लाखांचे दागिने हस्तगत
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : दिवसा घर घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा अट्टल गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत गुन्हेगारांकडून सव्वा पाच लाखाचे सोन्या- चांदीचे दागिने हस्तगत केले असून त्यांनी कबूल केल्याप्रमाणे ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दरम्यान, सहा पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांना जिल्ह्यातील दिवसा व रात्री घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते. आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांचे पथक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील दिवसा घरफोडी करणा-या आरोपीचा गोपनीय बातमीदारकडून शोध घेत असताना ॲनालिसीस विंगचे हवालदार सलीम बागवान यांनी केलेल्या विश्लेषणात आरोपी याचे घटनास्थळी संशयास्पद अस्तित्व आढळुन आले.
सदर पथकाने आरोपीत याचा करमाळा येथे सापळा रचुन अत्यंत कौशल्याने आरोपीत यास ताब्यात घेतले. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द बीड उस्मानाबाद, लातुर, सोलापूर ग्रामीण जिल्हयात दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपी हा नेहमी वेगवेगळे साथीदार घेवुन गुन्हे करीत असतो. सन २०२३ मध्ये जानेवारी महिन्यापासून आजतागायत एकुण ११ दिवसा घरफोडीचे गुन्हे त्याचे साथीदारा समवेत केल्याची कबुली दिली आहे.
या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड हे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या नेत्तृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, श्रेणी पोसई राजेश गायकवाड, सपोफौ श्रीकांत गायकवाड, सपोफौ बिराजी पारेकर, निलकंठ जाधवर, पोहवा/सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, पोना रवी माने, पोकॉ समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, चापोशि दिलीप थोरात, पोना व्यंकटेश मोरे ने. सायबर पो.स्टे यांनी केली आहे.