आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानी केला खून; पुरावा नष्ट करण्यासाठी उरकला अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 06:14 PM2021-04-15T18:14:03+5:302021-04-15T18:14:06+5:30

करमाळा तालुक्यातील घटना

Daughter murdered by father who harassed mother; Urakala funeral to destroy evidence | आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानी केला खून; पुरावा नष्ट करण्यासाठी उरकला अंत्यविधी

आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानी केला खून; पुरावा नष्ट करण्यासाठी उरकला अंत्यविधी

Next

करमाळा : वडील घरात सतत त्रास देऊन आईला मारहाण करीत असल्याने या प्रकारास वैतागून दोन मुलांनी मिळून स्वत:च्या वडिलांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी अंत्यविधीही उरकला होता. घटनेचा तपास करून करमाळा पोलिसांनी खरे आरोपी समोर आणले आहेत.

७ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास आई अविदा हिस वडील मृत भैरु हे मारहाण करीत होते. यावेळी संशयित निखील जगताप व अक्षय जगताप (दोघेही रा. वरकुटे, ता.करमाळा) यांनी संगनमत करून भैरु भागवत जगताप (५५, रा.वरकुटे-मुर्तीचे, ता. करमाळा) यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निखील व अक्षय या दोघांनी वडिलास जबरदस्तीने पकडून त्यांचे दोरीने पाय बांधले. त्यानंतर दोरीचा फास आवळून जीवे मारल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Web Title: Daughter murdered by father who harassed mother; Urakala funeral to destroy evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.