शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

coronavirus; ऑर्किस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्सबारही शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:24 AM

कोरोना व्हायरसमुळे घेतली खबरदारी; राज्यातील मनोरंजन नाट्यगृहे बंद करण्याचे आदेश

ठळक मुद्देजगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात अनेक उपाय राज्यातील मनोरंजन नाट्यगृहे बंद करण्याचे आदेश देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातील आॅर्केस्ट्रा बार व डान्स बार बंद करण्याचे आदेश देण्यात आले

संताजी शिंदे सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात ठिकठिकाणी ऑर्किस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्स बार बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाच्या करमणूक कर विभागाने दिले आहेत. कोरोना व्हायरसमुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. 

जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात अनेक उपाय योजले जात आहेत. राज्यातील मनोरंजन नाट्यगृहे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ऑर्किस्ट्रा बार व डान्स बार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

मंगळवारी दुपारी सोलापुरातील ऑर्किस्ट्रा बारच्या नावाखाली चालणारे डान्स बार बंद करण्याचे आदेश करमणूक कर विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत़  डान्स बारमध्ये येणारे बहुतांश ग्राहक हे शेजारच्या जिल्ह्यातील व कर्नाटक, आंध्रप्रदेशातील असतात. चंदेरी दुनियेत बारबालेच्या गाण्याचा, नृत्याचा आनंद घेण्यासाठी ही  मंडळी खासकरून सोलापुरात येत असतात. बेळगाव, विजयपूर, गुलबर्गा, इंडी आदी कर्नाटकातील भागातून येणारा ग्राहक वर्ग डान्स बारमध्ये येतो. 

दि.३१ मार्चपर्यंत ऑर्किस्ट्रा बार सुरू ठेवण्यात येऊ नये असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. आॅर्केस्ट्रा बार बंद झाल्याने सध्या सोलापुरातील रात्रीची चंदेरी दुनिया अंधारात गेली आहे. 

सोलापुरात १६ ते १८ आॅर्केस्ट्रा बार...सोलापुरात सध्या हैदराबाद रोडवर रसिक ऑर्किस्ट्रा बार व राजश्री आॅर्केस्ट्रा बार, बार्शी रोडवर सुखसागर ऑर्किस्ट्रा बार, अविराज आॅर्केस्ट्रा बार, पुणे रोडवर पॅराडाईज आॅर्केस्ट्रा बार, सुयोग ऑर्किस्ट्रा बार, न्यू विनय आॅर्केस्ट्रा बार, जय मल्हार आॅर्केस्ट्रा बार, गॅलक्सी आॅर्केस्ट्रा बार, विजापूर रोडवर आम्रपाली आॅर्केस्ट्रा बार, नागेश डान्स बार, कलवरी ऑर्किस्ट्रा बार, गुलमोहर आॅर्केस्ट्रा बार,नान्नज परिसरात दोन आॅर्केस्ट्रा बार व अन्य ठिकाणी असे एकूण १६ ते १८ आॅर्केस्ट्रा बार चालतात. 

बारबाला व कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत...- तब्बल १४ दिवसांची सुट्टी मिळाल्याने शहर व जिल्ह्यातील आॅर्केस्ट्रा बारमध्ये काम करणाºया बारबाला, गायक, संगीतकार आदी सर्व कलाकार हे आपल्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. बहुतांश बारबाला व कलाकार हे पश्चिम बंगाल, मुंबई या ठिकाणचे रहिवासी आहेत. आॅर्केस्ट्रा बारच्या मालकांनी सर्वांना घरी जाण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याdanceनृत्य