Curfew in Pandharpur city area from 7th to 13th August; Collector's Information | पंढरपूर शहर अन् परिसरात ७ ते १३ ऑगस्टपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाºयांची माहिती

पंढरपूर शहर अन् परिसरात ७ ते १३ ऑगस्टपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाºयांची माहिती

ठळक मुद्दे पंढरपूर शहराला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार

सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता ७ ते १३ ऑगस्ट २०२० पर्यंत पंढरपूर आणि परिसरात संचारबंदी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, गुरूवार ६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ पासून म्हणजेच ७ तारखेच्या पहाटेपासून १३ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे़ याच काळात प्रदक्षिणा मार्ग आणि परिसरातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचेही सांगितले़ केवळ दूध, मेडिकल, हॉस्पीटल सुरू राहणार असल्याचे सांगितले.

पंढरपुरातील संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी, शहरातील लोक ग्रामीण भागात जावून कोरोना संसर्ग वाढवू नयेत, बाहेरून लोकांचे आगमन आणि निर्गमन होऊ नये, यासाठी पंढरपूर शहराला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवासुविधा पुरवविणाºया आस्थापनांचे वाहतुकीच्या वाहनांकरिता सवलत देण्यात येणार असल्याचीही माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

Web Title: Curfew in Pandharpur city area from 7th to 13th August; Collector's Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.