शहरं
Join us  
Trending Stories
1
"कान उघडून ऐका..., 27 चा ट्रेलर ठीक नसेल"! अयोध्येतील भाजप पराभवावर हे काय बोलून गेले महंत राजूदास?
2
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
3
आजचे राशीभविष्य: व्यापारवृद्धी, अचानक धनलाभाचे योग; कामात यश, उत्साहवर्धक दिवस
4
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
5
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
6
राज्यातील १५ खासदार वयाची साठी ओलांडलेले; चाळिशीच्या आतील केवळ सहा!
7
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
8
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
9
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम
10
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण
11
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश
12
इतर राज्यांमध्येही चालली छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांची जादू
13
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : ‘वंचित’ला तब्बल ८ मतदारसंघांमध्ये विजयी मताधिक्यापेक्षाही जास्त मते
14
Lok Sabha Election Result 2024 : ६ राज्यांत काँग्रेसच्या पराभवामुळे सत्ता मिळवण्यात ‘इंडिया’ला अपयश
15
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, राजीनाम्याच्या मुद्द्यावर करणार चर्चा
16
बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण 
17
Lok Sabha Election Result 2024 : भाजपसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ठरले ‘लकी’
18
‘एमएमआर’मध्ये उपलब्ध अकरावीच्या चार लाख जागा, यंदा २५ हजार जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ 
19
महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला
20
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी

लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करणारा मजनू खाकीच्या जाळ्यात

By विलास जळकोटकर | Published: May 11, 2024 5:56 PM

सोलापूर : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडीगुलाबीनं लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव ...

सोलापूर: १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडीगुलाबीनं लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास जारी करुन त्याला अटक करण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी ३:३० च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. कोर्टाकडून मजनूला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला. अजय मल्लय्या स्वामी (वय-१९, रा. भारतरत्न इंदिरानगर, बेडर समाज मंदिराजवळ सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची १७ वर्षाच्या मुलीला नमूद आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने गुरुवारी सकाळी ७ ते दुपारी ३:३० च्या दरम्यान, लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला पळवून नेले.

दुपारी चारनंतर फिर्यादीला मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध केली मात्र ती मिळून न आल्याने तातडीने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवून घेऊन शोधाशोध सुरु केली. २४ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले. त्याला कोर्टात उभे करुन पोलिस कोठडी मागण्यात आली. मात्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याच आदेश दिला.

मुलांना समजून घ्या...आपल्या शाळा, कॉलेज अथवा कामाला जातातना त्या नेमक्या कोठे जातात. त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहे याकडे लक्ष ठेवावे. त्यांच्याशी सुंसवाद ठेवावा. अशा घटना नकळत घडतात. त्यांना न रागावता समजून घेऊन असा प्रकार चुकीचा कसा आहे याबद्दल सांगावे. यामुळे अशा घटनांची पुनुरावृत्ती घडणार नाही, असे आवाहन तपास अधिकारी सपोनि ज्योत्सना भांबिष्टे यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी