लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करणारा मजनू खाकीच्या जाळ्यात

By विलास जळकोटकर | Published: May 11, 2024 05:56 PM2024-05-11T17:56:39+5:302024-05-11T18:00:10+5:30

सोलापूर : १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडीगुलाबीनं लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव ...

crime deceit with the lure of love marriage in solapur | लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करणारा मजनू खाकीच्या जाळ्यात

लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करणारा मजनू खाकीच्या जाळ्यात

सोलापूर: १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गोडीगुलाबीनं लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. आईच्या लक्षात येताच ठाण्यात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास जारी करुन त्याला अटक करण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी ३:३० च्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. कोर्टाकडून मजनूला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला. अजय मल्लय्या स्वामी (वय-१९, रा. भारतरत्न इंदिरानगर, बेडर समाज मंदिराजवळ सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची १७ वर्षाच्या मुलीला नमूद आरोपीने ती अल्पवयीन असल्याची माहिती असूनही त्याने गुरुवारी सकाळी ७ ते दुपारी ३:३० च्या दरम्यान, लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला पळवून नेले.

दुपारी चारनंतर फिर्यादीला मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध केली मात्र ती मिळून न आल्याने तातडीने जेलरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवून घेऊन शोधाशोध सुरु केली. २४ तासाच्या आत आरोपीला पकडण्यात यश आले. त्याला कोर्टात उभे करुन पोलिस कोठडी मागण्यात आली. मात्र न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडीत ठेवण्याच आदेश दिला.

मुलांना समजून घ्या...
आपल्या शाळा, कॉलेज अथवा कामाला जातातना त्या नेमक्या कोठे जातात. त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहे याकडे लक्ष ठेवावे. त्यांच्याशी सुंसवाद ठेवावा. अशा घटना नकळत घडतात. त्यांना न रागावता समजून घेऊन असा प्रकार चुकीचा कसा आहे याबद्दल सांगावे. यामुळे अशा घटनांची पुनुरावृत्ती घडणार नाही, असे आवाहन तपास अधिकारी सपोनि ज्योत्सना भांबिष्टे यांनी केले आहे.

Web Title: crime deceit with the lure of love marriage in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.