शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

योगाचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल - बाबा रामदेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 18:20 IST

अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर योगचिकित्सा शिबीराला प्रारंभ

ठळक मुद्देभारत आज रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे जात आहे़ - बाबा रामदेवयोगाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला - बाबा रामदेवशेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्यायही बाबा रामदेव यांनी सुचविला़

अक्कलकोट : योग ही साधना असून माणसाचे आचार-विचार शुध्द करणारे तंत्र आहे़ शरीर आणि मनाच्या अस्वच्छतेसोबत बलशाली राष्ट्र निर्माण करण्याची ताकद योगामध्ये आहे़ योगाचा सृजनात्मक उपयोगच देशाला पुढे नेईल आणि उद्योगातून समृध्दी उभारण्यासोबतच देशाला आर्थिक महासत्ता बनवेल असे प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी केले़अक्कलकोट येथील राजे फत्तेसिंह मैदानावर शनिवारी सकाळी त्यांच्या योगचिकित्सा शिबीराला प्रारंभ झाला़ त्यानंतर योग शिबीर कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिबीराचे आयोजक सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते़यावेळी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, भारत आज रोगमुक्ती आणि व्यसनमुक्तीकडे जात आहे़ त्याचे श्रेय योगाला आहे़ भारत जगात महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून योगमार्गातून प्रवास सुरू आहे़ भारतासाठी हा सुवर्णकाळ आहे़ योगाने विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखविला असून सर्व व्याधी, आजार, नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती योगात आहे़ योगाचा सृजनात्मक वापरच देशाला जगात अग्रस्थानी पोहचवेल़देशातील भ्रष्ट्राचार दुर करण्यासाठी उत्तम आचरणाची आणि योग शिक्षणाची गरज आहे़ मनाची शुध्दता करण्याचे काम योगच करू शकतो, तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रष्ट्राचार थांबविण्यासाठी आवश्यक आहे़ पंतप्रधान मोदी यांनी डिजीटललायझेशनच्या माध्यमातून हे काम सुरू केले आहे़ शेतकºयांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सेंद्रीय शेतीचा पर्यायही बाबा रामदेव यांनी सुचविला़ ते म्हणाले की, तांत्रिक शेती, वैज्ञानिक शेती आणि सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून देशातील कृषी व्यवस्थेचे चित्र बदलू शकते, शेतकºयांनी जोडधंदा, पशुपालन करावे असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला़

टॅग्स :SolapurसोलापूरBaba Ramdevरामदेव बाबाYogaयोग