माकपच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात, राष्ट्रीय नेते सोलापुरात
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: December 6, 2022 19:51 IST2022-12-06T19:50:42+5:302022-12-06T19:51:10+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक मंगळवार, सहा डिसेंबर पासून सोलापुरात सुरु झाली आहे.

माकपच्या राज्यस्तरीय बैठकीला सुरुवात, राष्ट्रीय नेते सोलापुरात
सोलापूर : केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात पुढच्या वर्षी ५ एप्रिलला संसदेवर मोर्चा नेऊ. त्याची व्यापक तयारी आम्ही सुरु केली असून यात सोलापुरातील हजारो कामगार सहभाग होतील, अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक मंगळवार, सहा डिसेंबर पासून सोलापुरात सुरु झाली आहे. बैठकीदरम्यान अशोक ढवळे यांच्यासह माकप नेत्यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी त्यांनी मोर्चाबाबत माहिती दिली. बैठक गुरुवार, ८ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या बैठकीला माकपच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी हजेरी लावली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ही बैठक टॉनिक ठरत आहे. माकपाचे नवीन पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे मरियम ढवळे, सोलापूरचे संपर्कप्रमुख माजी खासदार निलोत्पर बसू, राज्य कमिटीचे सचिव उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, ॲड. एम. एस. शेख, युसुफ मेजर यांच्यासह अनेक नेते बैठकीत उपस्थित आहेत.