माकपच्या राज्य कमिटीची सहा डिसेंबरला सोलापुरात बैठक
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 19, 2022 16:07 IST2022-11-19T16:07:07+5:302022-11-19T16:07:14+5:30
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सोलापुरात नियोजित आहे.

माकपच्या राज्य कमिटीची सहा डिसेंबरला सोलापुरात बैठक
सोलापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची बैठक ६ ते ८ डिसेंबर दरम्यान सोलापुरात नियोजित आहे. या बैठकीत माकपचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेते हजेरी लावणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची असणार आहे.
रंगभवन सभागृहात तसेच चापमन शाळेच्या हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. सहा व सात डिसेंबर रोजी छत्रपती रंगभवन मध्ये दुपारी साडेचार वाजता पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. माकपाचे नवीन पॉलिट ब्युरो सदस्य अशोक ढवळे, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे मरियम ढवळे, सोलापूरचे संपर्कप्रमुख माजी खासदार निलोत्पर बसू, राज्य कमिटीचे सचिव उदय नारकर यांचा विशेष सत्कार या बैठकीत होणार आहे, अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे.