सरसकट वीजबिल माफीसाठी माकप आक्रमक; २५ हजार वीजबिलांची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 01:11 PM2020-08-26T13:11:13+5:302020-08-26T13:11:19+5:30

प्रकाशातून अंधारकडे नेणाºया महावितरण कंपनीचा कुटील डाव हाणून पाडा; माज आमदार नरसय्या आडम मास्तरांची भूमिका

CPI (M) aggressive for total electricity bill waiver; Holi of 25,000 electricity bills | सरसकट वीजबिल माफीसाठी माकप आक्रमक; २५ हजार वीजबिलांची केली होळी

सरसकट वीजबिल माफीसाठी माकप आक्रमक; २५ हजार वीजबिलांची केली होळी

googlenewsNext

सोलापूर : अवास्तव आणि न परवडणाºया वीजबिलाच्या २५ हजार पत्रकांची होळी करून वीज महावितरण कंपनी आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते़ जर सरकार रोख १० हजार अनुदान व सरसकट वीजबिल माफ करत नसेल तर  विना तडजोड राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा जाहीर इशारा यावेळी देण्यात आला. सिटू, किसान सभा, महिला आघाडी, युवा आघाडी, विद्यार्थी आघाडी या सर्व जनसंघटना मिळून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने  विविध मागण्यांचे लेखी मागणी पत्र केंद्र आणि राज्य सरकारकडे नोंदणीकृत टपालामार्फत पाठवून देण्यात आले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील उद्योजकांना दर १ युनिटला २ रुपये ७६ पैसे वीजबिलाची आकारणी तर सर्वसामान्यांना दर १ युनिटला ७ रुपये वीजबिल आकारणी केली जाते. या उद्योजकांसाठी राज्य सरकारकडून  स्वत:च्या तिजोरीवर ओझे टाकून ८०० कोटी रुपये अनुदानपोटी महावितरण कंपनीला अदा केली जाते. ही तफावत महाराष्ट्राला आर्थिक विषमतेकडे नेत आहे. 

शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेचा (प्रकाशाचा)  शोध लावले ते जगाला अंधारातून मुक्त करण्यासाठी मात्र आज महावितरण कंपनी पुन्हा श्रमिकांना प्रकाशातून अंधाराकडे नेऊ पाहत आहे तरीही सरकारला याची जाग का ? येत नाही याहून अधिक दुर्दैव दुसरे असूच शकत नाही. हा हेतुपुरस्सर रचलेला डाव असल्याची परखड टीका ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली. 

यावेळी नसीमा  शेख,नलिनी कलबुर्गी, सिद्धपा कलशेट्टी व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू, माशप्प विटे म.हानिफ सातखेड आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक  सिटू चे राज्य महासचिव अँड एम एच शेख  यांनी केले तर अनिल वास यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानले. सदर धरणे आंदोलन यशस्वी होण्यासाठी रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, सिद्धाराम उमराणी, बापू साबळे, फातिमा बेग, शकुंतला पानिभाते, दाऊद शेख, नरेश दुगाणे, अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, आरिफ मणियार जावेद सगरी मोहन कोक्कुल,बालकृष्ण मल्ल्याळ,  सनी शेट्टी, बालाजी गुंडे,अकील शेख, आसिफ पठाण, विजय हरसुरे बजरंग गायकवाड हुसेन शेख,रफिक नदाफ राजन काशीद , शिवा श्रीराम, सानी कोंडा , अमोल काशीद, सिद्राम गायकवाड, अमीना शेख, जुबेर शेख, इब्राहिम मुल्ला, शबाना सय्यद, शहाबुद्दीन शेख,भारत पाथरुट श्रीनिवास गड्डाम, प्रवीण आडम, गीता वासम, बन्सी कजाकवाके, विजय मरेड्डी, श्रीनिवास तंगडगी,  अंबादास बिंगी, प्रकाश कुर्हाड आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: CPI (M) aggressive for total electricity bill waiver; Holi of 25,000 electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.