वीज पडून गाईचा मृत्यू; पंढरपुरात घडली घटना
By प्रताप राठोड | Updated: April 8, 2023 16:41 IST2023-04-08T16:40:36+5:302023-04-08T16:41:39+5:30
शेतामध्ये सकाळी आठच्या सुमाराास अचानक मोठा विजेचा आवाज आला.

वीज पडून गाईचा मृत्यू; पंढरपुरात घडली घटना
सोलापूर : वीज पडून खिलार गाईचा मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथे शनिवारी सकाळी आठ वाजता घडली.
पंढरपूरसह परिसरामध्ये शनिवारी सकाळी अवकाळी पाउस झाला. शनिवारी ईश्वर वठार परिसरामध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकटासह आवकळी पाउसाने हजेरी लावली. शेतकरी रविंद्र गुंडे यांच्या शेतामध्ये सकाळी आठच्या सुमाराास अचानक मोठा विजेचा आवाज आला. कडकडाटानंतर विज खिलार गाईच्या अंगावर पडली.
यामध्ये गाईचा जाग्यावरच मृत्यू झाला. यावेळी घटनेच्या वेळी शेतकरी रविंद्र गुंडगे यांचा मुलगा सुरज गुंडगे हा दहा ते पंधरा फुट अंतरावरच जनावरांना चारा देण्याची साेय करत होता. दरम्यान या घटनेनंतर यावेळी पशुसंवर्धन विभाग तसेच तलाठी यांनी घटनास्थळी भेट देवन पंचनामा केला आहे. तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी देखील भेट देवून पाहणी केली.