पुतण्याकडून चुलतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:01 IST2021-02-20T05:01:56+5:302021-02-20T05:01:56+5:30

करमाळा : तालुक्यात एका गावात पुतण्याने चुलतीवर सात दिवस अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पीडित महिलेने करमाळा पोलिसात ...

Cousin tortured by nephew | पुतण्याकडून चुलतीवर अत्याचार

पुतण्याकडून चुलतीवर अत्याचार

करमाळा : तालुक्यात एका गावात पुतण्याने चुलतीवर सात दिवस अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पीडित महिलेने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे.

६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नऊ वाजता पती व मुलगा हे शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते.

एकेदिवसी रात्री अकरा वाजता पुतण्या हा घरी आला. दमदाटी करून मोटारसायकलवर बसवून हडपसर (पुणे) भागातील फ्लॅटवर घेऊन गेला. तेथे त्याने सलग सात दिवस अत्याचार केले. त्यानंतर नातेवाईकांनी तिला नेण्यासाठी आले असता तिने हडपसर पोलीस स्टेशन गाठले. तेथे पीडित महिलेने पुतण्याबरोबरच राहणार असे पोलिसांना सांगितले होते. परंतू त्याने तिच्या पती व मुलाचा खुन करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेने पोलिसात फिर्याद दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एल. जाधव हे करत आहेत.

Web Title: Cousin tortured by nephew