पंढरपुरात नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:04 IST2018-03-19T05:04:09+5:302018-03-19T05:04:09+5:30
गुढीपाडव्याला भरदुपारी १० ते १२ हल्लेखोरांनी नगरसेवक संदीप पवार (३३) यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करीत त्यांची हत्या केली.

पंढरपुरात नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या
पंढरपूर (जि. सोलापूर) : गुढीपाडव्याला भरदुपारी १० ते १२ हल्लेखोरांनी नगरसेवक संदीप पवार (३३) यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने वार करीत त्यांची हत्या केली.
संदीप पवार नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास एका हॉटेलसमोर चहा घेत असताना तेथे दबा धरुन बसलेल्या हल्लोखोरांपैकी एकाने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. इतरांनी कोयत्याने त्यांच्यावर वार केले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवार यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर सोलापूरच्या रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.