शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलं शिकतात ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:41 IST

मुंडफणेवाडी झेडपी शाळेचा उपक्रम; गुरुजी देतात मुलांना ऑनलाइन धडे

ठळक मुद्देजिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडफणेवाडी येथील शिक्षकांनी चांगला उपक्रम राबवलाया शाळेतील मुलांना ग्रुपद्वारे दररोज गृहपाठसुद्धा दिला जातोजिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत

श्रीपूर : कोरोनामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुट्टीचा सदुपयोग करावा, विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी मुंडफणेवाडी झेडपी शाळेतील शिक्षकांनी पालकांच्या सहाय्याने घरीच बसून विविध शैक्षणिक अ‍ॅप व यू-ट्यूबद्वारे ऑनलाइन  धडे देण्याचे काम हाती घेतले आहे.

माळशिरस तालुक्यातील महाळुंग केंद्रांमधील मुंडफणेवाडी झेडपी शाळा द्विशिक्षकीय शाळा आहे. शाळेचा पट ३७ असणाºया शाळेमध्ये सुरुवातीपासून आधुनिक पद्धतीने डिजिटल क्लासरूम तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. या शाळेतील मुख्याध्यापक समीर लोणकर व शिक्षिका अर्चना वाघ यांनी स्वखर्चाने डिजिटल क्लासरूम उभा करून मुलांना आधुनिकतेचे धडे दिले जात आहेत. यासाठी त्यांनी स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आदी साहित्य स्वखर्चातून आणून त्याद्वारे ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांना ऑनलाइन  पद्धतीने शिक्षण देण्याचे काम केले जात आहे.

पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून  त्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम ऑनलाइन  टेस्ट तसेच ब्लॉगद्वारे मुलांना ई-साहित्याची  माहिती दिली जाते.

असा शिकवला जातो ऑनलाइन  अभ्यासक्रम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्याच्या माध्यमातून एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यामध्ये विविध शैक्षणिक अ‍ॅप व यूट्यूबच्या माध्यमातून आॅनलाईन अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच या शाळेतील मुलांना ग्रुपद्वारे दररोज गृहपाठसुद्धा दिला जातो. मुले तोच पूर्ण केलेला गृहपाठ  ग्रुपवर टाकतात. तसेच अभ्यासामध्ये मुलांना काही शंका असेल तर व्हिडिओ कॉलद्वारे त्या शंका सोडविण्याचे काम केले जाते. त्यामुळे शाळा बंद असली तरी मुले गोडीने अभ्यास करतात याची  माहिती मुख्याध्यापक समीर लोणकर यांनी दिली.

कोरोनामुळे मुलांना सुट्टी मिळालेली आहे. त्याचा चांगला उपयोग करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडफणेवाडी येथील शिक्षकांनी चांगला उपक्रम राबवला आहे. त्यामुळे घरी बसून मुले आॅनलाईन अभ्यासक्रमाचा आनंद घेतात.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणSchoolशाळाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस