शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

कोरोनाचा फटका; अडत्यालाच ९०० रुपये देऊन त्या शेतकºयाने गाठले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:08 IST

उपळेच्या कलिंगड उत्पादकाची व्यथा; शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याची खंत

ठळक मुद्देकोरोना काळात शेतकºयांचा माल कवडीमोल भावाने विक्री होत आहेउपळे दुमाला येथील शेतकºयाला १३० कॅरेट कलिंगडाची विक्रीअन् शेतकºयाला मात्र रिकाम्या हाताने परतावे लागले आहे

वैराग: कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रात बसू लागला आहे. बळीराजाही यातून सुटलेला नाही. बार्शी तालुक्यातील एका शेतकºयाचे कलिंगड कवडीमोल भावानं विकलं गेलं. त्यांनी सोलापूरच्याबाजारपेठेत  ११३ कॅरेट कलिंगड विकून २९२०   रुपये पट्टी आली. त्यात हमाल-तोलाई, वाहतूक खर्च वगळता या शेतकºयाला पदरचेच ९०० रुपये द्यायची वेळ आली. 

कोरोना काळात शेतकºयांचा माल कवडीमोल भावाने विक्री होत आहे. उपळे दुमाला येथील शेतकºयाला १३० कॅरेट कलिंगडाची विक्री करून त्याच्या हातात काही रक्कम आली नाहीच, परंतु उलट अडत्यालाच ९०० रुपये पदरचे द्यावे लागले अन् शेतकºयाला मात्र रिकाम्या हाताने परतावे लागले आहे. उपळे दुमालाचे शेतकरी विकास पासले यांनी एक एकर कलिंगड पिकाची लागवड केली होती. यामध्ये अकरा टन माल निघाला. यासाठी पीक लागवडीपासून काढणीपर्यंत ५० हजार रुपये खर्च झाला. यातील आठ टन माल पुणे बाजारपेठेत एका कॅरेटला साडेचार रुपये दराने विक्री केला. त्याचे वाहतूक व अडत खर्च वजा जाता २८ हजार रुपये पदरात पडले. 

त्यानंतर सोलापूर अडत बाजारात तीन टन माल मंगळवार, ९ जून रोजी पाठवला होता. यामध्ये एका कॅरेटला एक रुपयापेक्षा कमी भाव मिळाल्याने ११३ कॅरेटचे विक्रीतून २९२० रुपये आले. मात्र याचे वाहन भाडे २५०० रुपये, अडत-हमाली ८८० रुपये, २२० रुपये तोलाई, २२० रुपये कॅरेट भाडे असा एकूण ३८२० रुपये अडत खर्च झाला. त्यामुळे सर्व खर्च वजा जाता शेतकºयाला पदरचे ९०० रुपये अडत्याला देऊन रिकाम्या हाताने गावी परतावे लागले. म्हणजे त्या शेतकºयाला एक एकरात पन्नास हजार रुपये खर्च करून फक्त २८ हजार रुपये पदरात पडले, तर बावीस हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार