शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरात ‘कोरोना’ व्हायरसची पोस्ट झाली व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 10:31 IST

सोशल मिडियावरील अफवांमुळे सोलापूर शहरात भीतीचे वातावरण; जिल्हाधिकारी म्हणाले काळजीचे नाही कारण

ठळक मुद्दे सोशल मीडियावर संबंधित रुग्णाचा अहवाल व्हायरल झाल्यावर शहरात वेगवेगळी अफवा पसरलीसोलापुरात कोरोना रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरलेआढळलेला रुग्ण नाशिकचा असून, त्याला तातडीने पुण्याला हलविले आहे अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या

सोलापूर : शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा रुग्ण आढळल्याची पोस्ट गुरुवारी दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. खासगी रुग्णालयातील लॅबने संशयित रुग्णाबाबत केलेल्या निदानाचा अहवाल फिरू लागल्यावर मात्र प्रशासनाचेही टेन्शन वाढले. शेवटी संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत खुलासा केल्यावर लोकांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत झाली. 

झाले असे दुपारी दीड वाजेच्या सुमाराला सोशल मीडियावर खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मायक्रोबायोलॉजीचा रिपोर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला. संदीप मोकाशी (वय ३६) या रुग्णाबाबत डॉ. अनुपम शहा यांनी दिलेल्या संदर्भावरून ही चाचणी करण्यात आलेली होती. अहवालात अ‍ॅटीपीकल बॅक्टेरियामध्ये मायकोप्लाझमा न्यूमोनिया आणि व्हायरसेसमध्ये कोरोना व्हायरस डिटेक्टेड असे नमूद केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हा अहवाल सोशल मीडियावर फिरू लागल्यावर जागरुक नागरिकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून हे खरे आहे काय अशी विचारणा सुरू केली. त्यावर ‘लोकमत’ने संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधून वस्तुस्थितीदर्शक फेसबुकवर आॅनलाईन बातमी प्रसिद्ध केल्यावर याची शहरभर चर्चा सुरू झाली. 

शहरात अफवांचे पीक- सोशल मीडियावर संबंधित रुग्णाचा अहवाल व्हायरल झाल्यावर शहरात वेगवेगळी अफवा पसरली. सोलापुरात कोरोना रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले. आढळलेला रुग्ण नाशिकचा असून, त्याला तातडीने पुण्याला हलविले आहे अशा पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. सुरुवातीला याबाबत नेमकी माहिती न मिळाल्याने हा विषय चर्चेचा बनला. विशेष म्हणजे अहवालावर असलेल्या नावाच्या व्यक्तीला सोलापूर प्रांत कार्यालयातील कर्मचारी ओळखत होते. मोकाशी हे आर्किटेक्चर असून, घरकूल बांधणीच्या कामाच्या फायली घेऊन महसूलच्या कार्यालयात येत होते. त्यामुळे या कर्मचाºयांनी एकमेकांना संपर्क साधून विचारणा सुरू केली. तसेच त्यामुळे जिज्ञासू व जागरूक नागरिकांनी खातरजमा करण्यासाठी ‘लोकमत’च्या कार्यालयाशी संपर्क साधला. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी त्या अहवालाची खातरजमा करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला व ‘लोकमत’ फेसबुक पेजवर वस्तुस्थिती मांडल्यावर लोकांच्या मनातील भीती निवळत गेली. 

नातेवाईकांनी पुण्याला हलविले- प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर गुरुवारी सकाळी मोकाशी यांच्या नातेवाईकांनी रुग्णास पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार हा रुग्ण परदेशी गेलेला नव्हता. पंधरा दिवसांपूर्वी तिरुपतीला गेल्याचे सांगण्यात आले. पण ४ मार्चच्या आधी तीन दिवसांपासून त्रास असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इतक्या दिवसांनी इन्फेक्शन होण्याची शक्यता नसल्याचे डॉ. तापडिया यांनी सांगितले. रुग्ण उपचारास प्रतिसाद देत असल्याने काळजीचे कारण नाही असे त्यांच्या पत्नी व नातेवाईकांना सांगण्यात आले होते. तरीही त्यांनी आज सकाळी रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलविण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्यMedicalवैद्यकीयSocial Mediaसोशल मीडिया