राजन पाटील यांनी घेतली कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST2021-03-17T04:22:34+5:302021-03-17T04:22:34+5:30

अनगर : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या पत्नी राजश्री राजन पाटील यांनी अनगर येथील प्राथमिक आरोग्य ...

Corona vaccine was taken by Rajan Patil | राजन पाटील यांनी घेतली कोरोनाची लस

राजन पाटील यांनी घेतली कोरोनाची लस

अनगर : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या पत्नी राजश्री राजन पाटील यांनी अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आरोग्य केंद्राच्या परिचारिका गुडे यांनी ही लस दिली. यावेळी नागरिकांनी कोणतेही शंका व भीती मनात न घेता लस घेण्याबाबत आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुल्ला, डाॅ. संतोष गुजरे व प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या कामाचे पाटील यांनी काैतुक केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुल्ला, डाॅ. संतोष गुजरे, डाॅ. सुहास कादे, डाॅ. पाथ्रुडकर, राम कदम, नारायण गुंड, आरोग्य सेविका पवार, तोडकर, शिंदे, पाटेकर उपस्थित होते.

---

१६ अनगर

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या पत्नी राजश्री राजन पाटील यांना कोरोनाप्रतिबंधक लस देताना वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुल्ला, डाॅ. संतोष गुजरे, डाॅ. सुहास कादे, डाॅ. पाथ्रुडकर, गुडे

Web Title: Corona vaccine was taken by Rajan Patil