शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा तालुक्यातील ५५ शाळांमधील ६४७ शिक्षकांची कोरोना चाचणी होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 08:41 IST

३२५ शिक्षकांची चाचणी पूर्ण दोन शिक्षक पॉझिटिव्ह; कोरोना चाचणी साठी आरोग्य केंद्रात गर्दी

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे 

येत्या  २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याचा महत्वाचा भाग म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरातील ग्रामिण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, तालुक्यातील ५५ शाळा मधील ६४७ शिक्षकांपैकी शुक्रवार सायंकाळ पर्यत ३२५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली यामधे दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.

काही शिक्षक आपल्या गावाकडे दिवाळी सुट्टी निमित्त रवाना देखील  झाले आहेत त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संपर्क होऊन शिक्षक बाधित झाले आणि लगेच शाळा सुरू झाल्या तर संसर्गाची  भीती पालकांना सतावत होती, यासाठी दिवाळी सुटीनंतर शिक्षकांची कोरोना चाचणी करायला हवी होती अशी चर्चा होती त्याबाबत शासनाने आदेश काढून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक केली होती त्यामध्ये ज्याना दमा, ह्रदयविकार, शुगर, थायरॉईड यासारखे आजार असणाऱ्याची  आर्टिपीसीआर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे तर इतर शिक्षकांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्याचे आदेश आहेत, शासन निर्णयानुसार सध्या १७ ते २२  नोव्हेंबर या काळात शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांची कोरोना  चाचणी सुरू असून आजपर्यंत ३२५   शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.

टप्प्याटप्प्याने होणार चाचण्यामंगळवेढा तालुक्यात नववी ते दहावी, बारावी पर्यंत ५५  शाळा आहेत अकरावी आणि बारावी सात कनिष्ठ महाविद्यालय आहे.  त्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांची तपासणी शुक्रवारी शनिवारी पहिल्या टप्प्यात दोन दिवस करण्यात येणार आहे, त्यानंतर इयत्ता सहावी ते आठवी ला शिकणाऱ्या सर्व शिक्षकाची कोरोना चाचणी दुसऱ्या टप्प्यात तर तिसऱ्या टप्प्यात पहिली ते पाचवी पर्यंत असलेल्या प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षकांना चाचणी घेण्यात येणार आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंत असलेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचा परिसर वर्गखोल्या स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे, येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी शाळा-महाविद्यालये गेटवर होणार आहे. तत्पूर्वी शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्र शिक्षकांना भरून घ्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ हवा खुल्या जागेत बसण्याची व्यवस्था शाळा महाविद्यालयाना करावी  लागणार आहे. प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक केले असल्याने त्याशिवाय  शाळा परिसरात प्रवेश दिला जाणार नाही असे आदेश गटशिक्षणाधिकारी पी. के. लवटे यांनी सर्व सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्यांना पाठवले आहे . फिजिकल डिस्टंसिंग ही सर्वात महत्वाची बाब सर्वांना पाळावी लागणार आहे.

शहरातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात किती शिक्षकांनी कोविड तपासणी केली याचा रोजच्या रोज अहवाल गटशिक्षणाधिकारी पी के लवटे घेत आहेत शुक्रवार सायंकाळ पर्यत तालुक्यातील ३२५ शिक्षकांची तपासणी करण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ प्रमोद शिंदे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.

प्रत्येक शिक्षकाला चाचणी बंधनकारक

शाळेत प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे .ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात  व्यवस्था करण्यात आली आहे तालुक्यातील ५५ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तील ६४७ शिक्षकांपैकी ३२५ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत.- पी. के. लवटे, गटशिक्षणाधिकारी, मंगळवेढा 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक