Breaking; नियोजन भवनातील अधिकाºयाला कोरोना; कार्यालयातील बैठकांना लावला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:23 IST2020-07-23T15:21:12+5:302020-07-23T15:23:44+5:30

गेल्या पंधरवड्यात विविध बैठकांना हजेरी; सोलापूर जिल्हा प्रशासनाने घेतली खबरदारी

Corona to the officer in the planning building; A break from office meetings | Breaking; नियोजन भवनातील अधिकाºयाला कोरोना; कार्यालयातील बैठकांना लावला ब्रेक

Breaking; नियोजन भवनातील अधिकाºयाला कोरोना; कार्यालयातील बैठकांना लावला ब्रेक

ठळक मुद्दे- सोलापूर शहरात कोरोनाचे रूग्ण वाढले- जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग झाला सतर्क- सोलापूर महानगरपालिकेचे नियोजन सुपरफास्ट

सोलापूर: जिल्हा नियोजन कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाला कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे.

सोलापुरात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठका घेत होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या बैठकीला गर्दी झाल्यामुळे पुढील बैठका जिल्हा नियोजन सभागृहात घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतरच्या सर्व बैठका जिल्हा नियोजनच्या सातरस्ता येथील सभागृहात होऊ लागल्या. या सभागृहात होणाºया महत्त्वाच्या बैठकांना हजेरी लावणाºया जिल्हा नियोजन कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयालाच कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेत या कार्यालयातील बैठकांना ब्रेक लावला आहे. आता जिल्हा नियोजन सभागृहाचे निजंर्तुकीकरण करण्यात येत आहे.

Web Title: Corona to the officer in the planning building; A break from office meetings