होटगी, मुळेगाव, अक्कलकोटमधील चौघांचा कोरोनाने मृत्यू; ग्रामीणमध्ये आढळले नवे ६ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 17:20 IST2020-06-13T17:18:47+5:302020-06-13T17:20:13+5:30
सोलापूर जिल्ह्यातील रूग्णसंख्या झाली ११६; ३४ जणांनी केली कोरोनावर मात

होटगी, मुळेगाव, अक्कलकोटमधील चौघांचा कोरोनाने मृत्यू; ग्रामीणमध्ये आढळले नवे ६ रूग्ण
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (महानगरपालिका हद्द वगळून) कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी ग्रामीणमध्ये ६ रूग्ण आढळले. शिवाय चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ११६ कोरोना बाधित सोलापूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. दरम्यान, ३४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील ८१ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी ७५ अहवाल निगेटिव्ह तर ६ पॉझिटिव्ह आले़ त्यात मौलाली गल्ली, अक्कलकोट, बागवान गल्ली, अक्कलकोट, होटगी, ता. दक्षिण सोलापूर, नवीन विडी घरकुल, ता. दक्षिण सोलापूर, क्वॉटर्स, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय, कुंभारी येथे रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, शनिवारी मौलाली गल्ली, अक्कलकोटमधील दोघांचा पारधी वस्ती, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथील एकाचा तर होटगी ता. दक्षिण सोलापूर येथील एकाचा मृत्यू झाला आहे.