सलगर, बोरगांव, वांगी, मुळेगावात आढळला कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:31 IST2020-06-26T16:28:39+5:302020-06-26T16:31:23+5:30
नव्याने आढळले सहा रुग्ण; एकूण रूग्णसंख्या पोहोचली २६६ वर

सलगर, बोरगांव, वांगी, मुळेगावात आढळला कोरोना बाधित रूग्ण
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट शहर व तालुक्यात चार तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी व मुळेगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६६ इतकी झाली आहे़ शुक्रवारी नव्याने सहा रुग्ण आढळले त्यामध्ये अक्कलकोट बुधवार पेठ २, दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे एक, मुळेगाव येथे एक अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव व सलगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे़ शुक्रवारी प्रयोगशाळेकडून ११९ अहवाल आले, त्यापैकी ११३ अहवाल निगेटिव्ह आहेत़ आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर उपचारानंतर ९९ जण बरे होऊन घरी गेले आहेत़ अद्याप १४३ जणांवर उपचार सुरू आहेत़